शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यातील सात लाख रुपयांचा अपहार

By admin | Updated: October 11, 2016 03:27 IST

एका अनिवासी भारतीयाच्या बँक बचत खात्यातून सात लाख सहा हजार रुपयांचा अपहार करण्यात आला

नागपूर : एका अनिवासी भारतीयाच्या बँक बचत खात्यातून सात लाख सहा हजार रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या रकमेची अज्ञात आरोपीने १२ आॅक्टोबर २०१५ रोजी उचल केली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.न्यायालयाने याप्रकरणाच्या तपासावर असमाधान व्यक्त केले आहे. तपास अधिकाऱ्याला १४ आॅक्टोबरपर्यंत आवश्यक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा त्यांना वरिष्ठ अधिकारी व प्रकरणाच्या रेकॉर्डसह न्यायालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष नुकतीच सुनावणी झाली. अब्दुल अझीम मलिक असे अनिवासी भारतीयाचे नाव आहे. ते सध्या सौदी अरेबिया येथे स्थायिक झाले आहेत. पूर्वी ते गिट्टीखदान येथे राहात होते. प्रकरणाच्या तपासात समाधानकारक प्रगती झाली नसल्यामुळे त्यांचे ज्येष्ठ बंधू अब्दुल गनी मलिक यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व आरोपींवर कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. ए. एच. जमाल तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता नितीन रोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)