शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

समता सैनिक दलाचे सेवाव्रत

By admin | Updated: October 5, 2014 00:58 IST

लाखोंच्या निळ्या गर्दीने दीक्षाभूमी ओसंडून वाहत होती. हातात निळे झेंडे आणि मुखात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकाराने हा अख्खा परिसर दुमदुमत होता. देशभरातून येणाऱ्या अनुयायांचा प्रचंड उत्साह

नागपूर : लाखोंच्या निळ्या गर्दीने दीक्षाभूमी ओसंडून वाहत होती. हातात निळे झेंडे आणि मुखात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकाराने हा अख्खा परिसर दुमदुमत होता. देशभरातून येणाऱ्या अनुयायांचा प्रचंड उत्साह आणि ऊर्जा प्रत्येक जण अनुभवत असताना कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून समता सैनिक दलाचे तब्बल दोन हजार स्वयंसेवक डोळ्यात तेल घालून होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे हे स्वयंसेवक विदर्भासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पँट आणि हातात काठी घेऊन हे स्वयंसेवक सलग तीन दिवस जागोजागी मदतीसाठी उभी होते. दलाचे प्रदीप डोंगरे यांनी सांगितले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्वयंस्फूर्तीने हे स्वयंसेवक येतात. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या दोन दिवसांपूर्वी या सर्वांना मार्गदर्शन केले जाते. प्रत्येकाला कामाची माहिती व त्यांचे स्थळ ठरवून दिले जाते. दीक्षाभूमीवर येणारा प्रत्येक अनुयायी हा आमचा बांधव आहे. यामुळे त्यांच्याशी बोलताना, माहिती देताना एकप्रकारची आत्मीयता असते. यामुळेच अनेक तरुण या दलाशी दरवर्षी जुळतात. दीक्षाभूमीवर सुरक्षा देण्यासोबतच व्यसन करणाऱ्या युवकांना मार्गदर्शनही केले जाते. यासाठी एक वेगळी चमू कार्यरत असते. आतापर्यंत आम्ही शेकडो युवकांंना व्यसनातून बाहेर काढले आहे. बाबासाहेबांनी आमच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. यात जर सर्वांनी एकत्र येऊन एका सूत्रबद्ध पद्धतीने व निष्ठापूर्वक रीतीने वाटचाल करण्याचा निर्धार केला तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे ‘भारत बौद्धमय’ करण्याचे स्वप्न काहीअंशी साकार झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.