शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

रामझुल्यासाठी सप्टेंबरचा मुहूर्त

By admin | Updated: July 1, 2014 01:00 IST

नागपुरातील रेल्वे स्थानकाजवळील रामझुला वाहतुकीसाठी एप्रिल महिन्यात सुरू होईल ही पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केलेली घोषणा फोल ठरली आहे. अधिकाऱ्यांनी आता या पुलासाठी

नागपूर : नागपुरातील रेल्वे स्थानकाजवळील रामझुला वाहतुकीसाठी एप्रिल महिन्यात सुरू होईल ही पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केलेली घोषणा फोल ठरली आहे. अधिकाऱ्यांनी आता या पुलासाठी सप्टेंबरचा मुहूर्त दिला आहे. या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने हा नवीन मुहुर्तही बारगळण्याची शक्यता अधिक आहे.पालकमंत्र्यांनी आज रामझुला बांधकामाचा आढावा घेतला. बांधकामाला होणाऱ्या विलंबाची कारणे अधिकाऱ्यांकडून समजून घेतली आणि शिल्लक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी मोघे यांना दिलेल्या माहितीनुसार पुलाच्या स्लबमध्ये तांत्रिक अडचण आल्याने दोन महिने काम थांबले होते. पुलाच्या एका बाजूने दोन स्लॅब टाकण्यात आले असून सदरकडे जाणाऱ्या भागाकडे तीन स्लॅब टाकण्यात येणार आहे. हे काम अद्याप शिल्लक आहे. हे संपूर्ण काम सप्टेबंरपर्यंत चालणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी काम पूर्ण करून त्याचे उद््घाटन व्हावे, अशी इच्छा मोघे यांनी बैठकीत बोलून दाखविली. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही बाब शक्य नाही. सप्टेबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीला रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये उपस्थित होते. मातंग समाज भवनमातंग समाजभवनाचे काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात त्याचे उद््घाटन होण्याची शक्यता आहे. नागपूर सुधार प्रन्यासशी संबंधित प्रकल्पांबाबत मोघे यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. वर्धा मार्गावर हे भवन बांधण्यात आले असून त्यावर ४ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)