शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे निधन

By मंगेश व्यवहारे | Updated: March 19, 2025 14:59 IST

Nagpur : जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले

नागपूर : ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे बुधवारी निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते.  दुपारी ४ वाजता त्यांच्या सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. प्रा. मा.म. देशमुख हे शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले. शिक्षणाची त्यांना प्रचंड आवड होती. प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरीट उत्तीर्ण झाले होते. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांची चिकित्सक वृत्ती असल्याने ते इतिहासातील सत्यता बाहेर काढायचे. १९५४-१९६३ नागपूर पर्यंत नागपूर महापालिकेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. १९६४ नंतर धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर मध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १ ऑगस्ट १९९६ ला सेवानिवृत्त झाले. 

नवीन इतिहासाची मांडणी करणे, बहुजन जागृतीसाठी आपल्या लेखणीतून त्यांनी नवीन दालन उघडले. लेख भाषणे देऊन बहुजनांमध्ये जनजागरण केले. मध्ययुगिन भारताचा इतिहास या ग्रंथाचा माध्यमातून राजकीय, सामाजिक, संशोधन साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळविला होता. बहुजन समाज व चळवणीची मोठी हाणी झाली झाल्याने खंत व्यक्त होत आहे. 

"प्रा. मा.म. देशमुख हे इतिहास संशोधन क्षेत्रातील तेजस्वी तारा होते. बहुजनांचे उद्धारक होते. चळवळीला समोर नेण्याचे काम त्यांनी लेखनीतून केले. ते कांशीरामजीच्या विचारांचे पाईक होते. त्यांच्या जाण्याचे बहुजन समाजाची व चळवळीची प्रचंड हाणी झाली आहे."- डॉ. जयंत जांभूळकर, अध्यक्ष, फुले शाहू आंबेडकर टीचर्स असोसिएशन

टॅग्स :nagpurनागपूर