शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांच्या सुरक्षा रक्षकांची मनपाला चिंता

By admin | Updated: July 14, 2015 03:09 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केंद्र्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा दिली जाणार आहे.

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केंद्र्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा दिली जाणार आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफ विभागाकडे देण्यात आली आहे. संघ मुख्यालयापासून जवळच्या भागात सुरक्षा ताफ्यातील जवानांच्या निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु उंटखाना येथील महापालिके ची डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेजची इमारत उपलब्ध केली जाणार आहे. शाळा व कॉलेजची जागा वार्षिक ४,७२,९१५ रुपये भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. मनपाच्या २० जुलैच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. परंतु या प्रस्तावाला विरोधी सदस्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नगरसेवक योगेश तिवारी यांनी या निर्णयाच्या विरोधात तयारी सुरू केली आहे. सीआयएसएफने निवासासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. त्यानंतर भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करण्याबाबतचा प्रस्ताव मनपाकडे पाठविण्यात आला. संघ परिवारासंदर्भातील मुद्दा असल्याने भाजप नेतृत्वातील मनपातील सत्तारूढ नागपूर विकास आघाडी जागा उपलब्ध करण्यासाठी कामाला लागली आहे. घाईघाईत उंटखाना येथे वर्ग भरत असतानाही येथील प्राथमिक शाळा भाड्याने देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सभागृहाची मंजुरी मिळण्यापूर्वीच मनपाच्या मालमत्ता विभागाने शाळा इमारत भाड्याने देण्याला सहमती दिल्याची माहिती आहे. या शाळेत इयत्ता १ ते ४ मध्ये ३७ विद्यार्थी आहेत. या शाळेचा तळमजला व पहिला मजला अशी ४९२. ६२ चौ.मी. इमारत उपलब्ध केली जाणार आहे. पाच वर्षांसाठी हा करार केला जाणार आहे. सीआयएसएफचे डप्युटी इन्स्पेक्टर जनरल यांनी यासंदर्भात मनपाला पत्र पाठविले आहे. एक वर्षाचे भाडे अनामत रक्कम म्हणून मनपाकडे जमा करावी. भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात येईल. वीज व पाण्याचे बिल सीआयएसएफला भरावे लागेल, अशा शर्ती मनपाने घातल्या आहेत. (प्रतिनिधी)विद्यार्थी कसे शिकणार ?शाळेत सीआयएसएफ जवानांच्या निवासाची व्यवस्था केल्यास बंदुकधारी जवानामुळे या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर परिणाम होईल. त्यांना शिक्षण घेता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक योगेश तिवारी व या परिसरातील नागरिकांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.