शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पर्यटनाला सी-प्लेनचे बूस्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:31 IST

विदर्भातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी येथे सी-प्लेन प्रकल्प राबविला जाणार आहे़

ठळक मुद्देप्रकल्पाचा आढावा : नासुप्र व विमानतळ विकास कंपनीत होणार करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी येथे सी-प्लेन प्रकल्प राबविला जाणार आहे़ यासाठी नागपूर सुधार प्रन्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसोबत करार करणार आहे़ सी-प्लेनमुळे विदर्भातील पर्यटनाला बूस्ट मिळणार आहे.पर्यटकांना विदर्भातील पर्यटन स्थळांची सफर करता येईल़ यामुळे नागपूर-शेगाव, नागपूर-ताडोबा,नागपूर-नवेगाव खैरी,नागपूर-नागझीरा, नागपूर-नवेगाव बांध(पेंच) इत्यादी ठिकाणी जॉय राईड, सुलभ परिवहन पर्याय, आपत्ती व्यवस्थापन, हवाई रुग्णवाहिका सेवा, व्याघ्र पर्यटन इत्यादी सेवा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सी-प्लेन प्रकल्प राबविण्याचा शासनाचा मानस आहे.या प्रकल्पामुळे पर्यटकांना विदर्भातील पर्यटन स्थळांची सफर करता यावी, यासाठी नागपूर-शेगाव, नागपूर-ताडोबा,नागपूर-नवेगाव खैरी, नागपूर-नागझीरा, नागपूर-नवेगाव बांध (पेंच) इत्यादी ठिकाणी जॉय राईड, सुलभ परिवहन पर्याय, आपत्ती व्यवस्थापन, हवाई रुग्णवाहिका सेवा, व्याघ्र पर्यटन इत्यादी सेवा सी-प्लेनच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे. सोमवारी नासुप्रच्या छत्रपती शिवाजी सभागृहात या प्रकल्पासंदर्भात बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ प्रबंधक (आॅपरेशन्स आणि सेफ्टी) लक्ष्मीनारायण भट्ट, वन विभाग चंद्रपूर येथील उप मुख्य वनसंरक्षक नरवणे व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते़सी -प्लेन प्रकल्पासंदर्भात नासुप्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीसोबत करार करणार असल्याची माहिती डॉ़ दीपक म्हैसेकर यांनी दिली़ तलावात जेटी बांधकाम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मेरिटाइम बोर्डमार्फत केले जाईल तर पर्यटकांना इतर सुविधा पुरविण्याचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व वन विभागामार्फत करण्यात येईल. यात नासुप्र हे समन्वयक यंत्रणा म्हणून कार्यरत राहील.व्याघ्र पर्यटनाला मिळेल चालनासी-प्लेन प्रकल्पाच्या माध्यमातून व्याघ्र पर्यटनाला प्रोत्साहन देण्याकरिता ताडोबा, नागझीरा आणि पेंच येथे वाहनाची व्यवस्था व निवास सेवा आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. जलाशयाची उपलब्धता, प्रकल्प राबविण्याकरिता संमतीपत्र देणे, विकास प्रकल्पाच्या कामांकरिता प्रस्ताव तयार करून त्यास कार्यान्वित करणे, तसेच कार्यान्वित विकास कार्याच्या देखरेखीसाठी यंत्रणा सुनिश्चित करणे आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.