शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉटलँडच्या युवकाने लावला चुना

By admin | Updated: November 12, 2016 02:51 IST

लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याच्या नावावर एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीची स्कॉटलँडच्या व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला फसविले : फेसबुकद्वारे फ्रेण्डशीप नागपूर : लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याच्या नावावर एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीची स्कॉटलँडच्या व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लॉटीर पीटर रा. स्कॉटलँड असे आरोपीचे नाव आहे. पीडित सीमा इंगळे या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थिनीला पीटरने फेसबुकवर ‘फ्रेण्डशीप’ पाठवली. सीमाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. यानंतर पीटर तिला व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज पाठवू लागला. त्याने एप्रिल महिन्यात पाठविलेल्या मॅसेजद्वारे अमेरिका किंवा ओएनजीसीमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. नोकरीच्या लालसेने सीमा त्याच्या जाळ्यात अडकली. पीटरने सीमाला तिच्या नावाने भेटवस्तू असलेले एक पार्सल आणि ४० हजार पौंड पाठवल्याचे सांगितले. तसेच हे सामान घेण्यासाठी कस्टम शुल्क म्हणून १५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर पार्सल विमानतळावरच असल्याचे सांगून पुन्हा ४० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. पैसे जमा न केल्यास मनी लाँड्रिगच्या प्रकरणात फसवण्याची भीती दाखवली. नियमांची माहिती नसल्याने सीमा घाबरली. तिने ४० हजार रुपये जमा केले. यानंतरही पार्सल किंवा नोकरीचा कुठलाही पत्ता मिळाला नसल्याने चिंतेत पडलेल्या सीमाने पीटरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर त्याने कुठालही प्रतिसाद दिला नाही. काही वेळानंतर त्याचा मोबाईल नंबरसुद्धा बंद झाला. तेव्हा आपण फसवले गेल्याचे सीमाच्या लक्षात आले. गेल्या सहा महिन्यांपासून सीमा या प्रकरणी तक्रार करायची की नाही, याचा विचार करीत होती. शेवटी प्रतापनगर पोलीस ठाण्यात जाऊन तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञानांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीमा ही बाहेरगावची विद्यार्थिनी आहे.(प्रतिनिधी)दिल्लीच्या टोळीवर संशय या प्रकरणात दिल्ली येथील सायबर टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिल्ली येथे नायजेरियन युवक या प्रकारची फसवणूक करीत असतात. या टोळीतील सदस्य यापूर्वी सुद्धा अनेकदा सापडले आहे. तुरुंगातून सुटताच ते पुन्हा सक्रिय होतात.