शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या दुष्काळात मंजूर पदांना कात्री

By admin | Updated: August 21, 2016 03:13 IST

नागपूर विभागात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. कामाचा व्यापही वाढतो मात्र आरटीओतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरलीच जात नाही.

आरटीओत कामाचा वाढला ताण : सहायक मोटार वाहन निरीक्षकाची ५८ पदे केली कमीसुमेध वाघमारे नागपूरनागपूर विभागात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. कामाचा व्यापही वाढतो मात्र आरटीओतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरलीच जात नाही. परिणामी, कामाची गती मंदावते. याचा फटका कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना बसतो. सद्यस्थितीत नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अशा विचित्र कात्रीत सापडले आहे. तब्बल ४४ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, परिवहन विभागाने नागपूर विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षकांची ६६ पदे वाढविण्याचा निर्णय घेतला असताना अचानक ५८ पदे कमी केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागपूर विभागाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) नागपूर ग्रामीणसह, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा ही पाच आरटीओ कार्यालये येतात. नागपूर विभागात दिवसाला सुमारे ३०० नवीन वाहनांची नोंद होते. यातील सर्वाधिक वाहनांची नोंद एकट्या नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात होते. वर्षभरात साधारण १० लाख वाहने रस्त्यावर येतात. त्यामुळे आरटीओच्या कामाचा व्याप प्रचंड वाढला आहे. मात्र, त्या तुलनेत कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तुटवडा आहे. अनेक वर्षांत रिक्त झालेली कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आलेली नाहीत. याचा प्रभाव रोजच्या कामकाजावर पडला असून याचा फायदा दलाल घेत असल्याचे चित्र आहे. नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये ४६ पदे रिक्तसर्वात जास्त महसूल गोळा करणाऱ्या नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात ४६ पदे रिक्त आहेत. कार्यालयात ११९ पदे मंजूर असताना केवळ ७३ पदे भरण्यात आली आहेत. विशेषत: सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची तीन पदे, मोटार वाहन निरीक्षकाचे सात तर सहायक मोटार वाहन निरीक्षकाची १० पदे रिक्त आहेत. परिवहन विभागाने या कार्यालयासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या १० वाढीव पदांना मंजुरी दिली होती, परंतु महिना होत नाही तोच नऊ पदे कमी केली. परिणामी, कामाचा ताण वाढला असून प्रलंबित कामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.