शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील शाळा आज उघडणार, शिक्षकांना टेस्ट बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

शिक्षण सभापती व शिक्षणाधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मिशन बिगिन अगेनअंतर्गत महापालिका हद्दीतील ...

शिक्षण सभापती व शिक्षणाधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मिशन बिगिन अगेनअंतर्गत महापालिका हद्दीतील शाळा, विद्यालये आज ४ जानेवारीपासून सुरू होत आहेत. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविडची आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

शाळेच्या पहिल्या दिवशी मनपाचे शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर व पदाधिकारी विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. तसेच विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवादही साधतील.

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार कोविडसंदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचना आणि अटींच्या अधीन राहून इयत्ता १० वी आणि १२ वीचे वर्ग ४ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचना आणि अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. शाळेमध्ये थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, साबण, पाणी आदी सर्व आवश्यक वस्तू उपलब्ध असण्याबाबत शाळा प्रशासनाने दक्षता घ्यावी.

....

नियमांचे पालन बंधनकारक

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविडची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर, वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी, स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्याचे व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणाच्या खुणा करणे आवश्यक आहे.

...

पालकांची लेखी सहमती

विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे, याबाबत संपूर्ण साहित्याची उपलब्ध करणे हे प्रत्येक शाळेला बंधनकारक आहे.

...

अहवाल सादर करणे बंधनकारक

आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करूनच शाळा सुरू करण्यात याव्यात. उपरोक्त बाबींची पूर्तता झाली असल्याचा अहवाल जिल्हा परिषद नागपूर माध्यमिक शिक्षणाधिकारी, मनपा शिक्षणाधिकारी यांनी मनपा आयुक्तांना सादर करणे बंधनकारक आहे.

...............

सहा पॉझिटिव्ह

मनपाचे २५८ शिक्षक आणि १३० अन्य कर्मचारी यांची कोविड टेस्ट करण्यात आली. यात सहा जण पॉझिटिव्ह निघाले.