शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
3
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
4
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
5
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
6
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
7
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
8
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
9
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
10
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
11
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
12
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
13
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
14
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
15
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
16
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
17
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
18
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
19
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
20
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
Daily Top 2Weekly Top 5

खवल्या मांजराची तस्करी, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 23:45 IST

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने वर्धा रोडवरुन बुधवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जिवंत खवल्या मांजर ताब्यात घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना वन विभागाने वर्धा रोडवरुन बुधवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जिवंत खवल्या मांजर ताब्यात घेण्यात आले आहे.

१६ जूनच्या पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास खवल्या मांजर या प्राण्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. या आधारावर नागपूर वनविभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी संयुक्तपणे सापळा रचला. एका ट्रक ट्रेलरमधून ते आणण्यात आले होते, हे विशेष !

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतल्यावर चौकशी केली असता एका ट्रक ट्रेलरमधून ते आणल्याचे सांगितले. यावरून एमएच-४९ एटी-९५५६ क्रमांकाच्या वाहनाला आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. खवल्या मांजराला वैद्यकीय तपासणीसाठी वन्यजीव उपचार केंद्रात पाठविले. या चौकशीदरम्यान पुढे आलेल्या माहितीच्या आधारावरून बालाघाट (मध्य प्रदेश) येथून एका आरोपीला खवल्या मांजराच्या खवल्यांसह अटक करण्यात आली. यामुळे आता या प्रकरणातील आरोपींची संख्या चारवर पोहचली आहे. या सर्वांवर वन गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना पाच दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी वन विभागाने बरीच गुप्तता पाळली असून माध्यमांनाही या माहितीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, हे विशेष !

टॅग्स :wildlifeवन्यजीवArrestअटक