शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सावनेर नगर पालिका ‘लय भारी’

By admin | Updated: May 7, 2017 02:13 IST

अपारंपरिक ऊर्जेचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

सौर ऊर्जेचा होणार कार्यालयात वापर : जिल्ह्यात पहिलाच प्रयोग गणेश खवसे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपारंपरिक ऊर्जेचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यालाच अनुसरून .त्याचा वापरही सुरू झाला आहे. रस्त्या-रस्त्यांवर सौर दिव्यांची यंत्रणा बसवून प्रकाश पोहोचवण्याचे प्रयत्न देशपातळीवर सुरू आहेत. विजेचा पुरवठा अखंड सुरू राहण्याकरिता आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता अपारंपरिक ऊर्जेचे (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा) प्रकल्प सर्वत्र उभारले जात आहेत. याच शृंखलेत सावनेर नगर परिषदही आली आहे. तेथे सध्या सौर पॅनल उभारून कार्यालयात वापरात येणाऱ्या विजेचे उत्पादन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अशाप्रकारचा हा नागपूर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. सावनेर नगरपालिकेला शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणमार्फत २० किलोवॅट क्षमतेचे ऊर्जा संयंत्र मंजूर केले आहे. या प्रकल्पाची किंमत २३ लाख रुपये आहे. हे सौर ऊर्जा संयंत्र सावनेर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर ३५०० फूट जागेत उभारण्यात येत आहे. एकूण ८० पॅनल आहेत. यापासून अख्ख्या नगर परिषद प्रशासकीय इमारतीला म्हणजेच कार्यालयाला विद्युत पुरवठा होणार आहे. संगणक असो की पंखे, कूलर त्याद्वारे चालविले जाऊ शकते. तीन आठवड्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून सध्या पूर्णत्वाच्या दिशेने झेप घेतली आहे. अवघ्या काही दिवसांत हा प्रकल्प पूर्ण होऊन वीजनिर्मिती तेथून सुरू होणार आहे. ती वीज कार्यालयाला मिळणार आहे. शासनाची ही योजना असल्याने त्याचा नगर परिषदेवर कोणताच अतिरिक्त भार नाही. वीज देयक स्वरुपात जाणाऱ्या पैशाचीही बचत या माध्यमातून होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेला हा प्रयोग पूर्ण सावनेरात राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष रेखा मोवाडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. अरविंद लोधी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.