शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाच मिनिटात २८ विषय मंजूर

By admin | Updated: January 5, 2016 03:15 IST

शहरातील विकास कामात महत्त्वाची भूमिका असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी अवघ्या

नागपूर : शहरातील विकास कामात महत्त्वाची भूमिका असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी अवघ्या पाच मिनिटात २८ विषयांना मंजुरी देण्यात आली. चर्चा न होता महत्त्वाच्या विषयांना मंजुरी दिली जात असल्याने समितीतील भाजप सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंत्राटदारांच्या आग्रहावरून हा प्रकार सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचे असल्याचे कारण पुढे करून सायंकाळी ५ वाजता बैठक सुरू केली आणि ५.०५ मिनिटांनी ती संपवली. त्याचवेळी काही सदस्य समिती कक्षाजवळ पोहोचले. मात्र, त्यांना बैठक संपल्याची माहिती देण्यात आली. स्थायी समितीपुढे अनेकदा अडचणीचे विषय मंजुरीसाठी येतात. अशा विषयावर चर्चा होण्याची गरज असते. परंतु चर्चा न होताच बैठकीत महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे सिंगारे सायंकाळी ६ वाजता कार्यालयात होते. प्रभागातील कामांना मंजुरी मिळावी म्हणून सदस्य उघड विरोध करण्यासाठी पुढे येत नाहीत. वर्षभराने महापालिकेची निवडणूक होणार असल्याने प्रभागातील विकास कामे मार्गी लागावी यासाठी सदस्यांनी विविध विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे दिले आहेत. परंतु बैठकीत सदस्यांना प्रस्ताव मांडण्याची संधीच दिली जात नाही. काही विशिष्ट नगरसेवकांचीच कामे होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. बैठक काही मिनिटात संपवल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अनुषंगाने समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही. (प्रतिनिधी)तीर्थक्षेत्र विकास आखड्याला मंजुरी४पारडी भागातील श्री भवानी मंदिर, पुरातन श्री गणेश मंदिर व मुरलीधर मंदिराला ‘क’ तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे. या मंदिरांच्या विकासासाठी १२ कोटी ६८ लाखांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.स्मार्ट सिटी जनजागृती प्रस्ताव स्थगित४केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा विकास अराखडा व अन्य विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यासाठी महापालिकेने कंपनीची नियुक्ती केली आहे. परंतु स्मार्ट सिटी जनजागृती प्रस्तावावर चर्चा शक्य नसल्याने हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला आहे.