शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

विधान मंडळाला सुरक्षा कवच

By admin | Updated: November 28, 2015 03:34 IST

७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी मुंबईतील विधिमंडळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी नागपुरातील..

चार ट्रक साहित्य दाखल : सचिवालय सोमवारपासून सुरू होणारंनागपूर : ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी मुंबईतील विधिमंडळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी नागपुरातील विधान भवनाची सुरक्षा आपल्या ताब्यात घेतली आहे. तसेच मुंबईहून सचिवालयातील फाईल्ससह एकूणच महत्त्वाचे दस्तऐवज घेऊन चार ट्रक नागपुरात दाखल झाले आहेत. दस्तऐवजांच्या पेट्या संबंधित विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. विधिमंडळाच्या सुरक्षा अधिकारी (सार्जंट) यांनी शुक्रवारपासून विधान भवनातील सुरक्षा आपल्या ताब्यात घेतली आहे. विधानभवनातील मुख्य गेटवर प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. ओळख पत्र दाखविल्यावरच प्रवेश दिला जात आहे. यासोबतच विधान भवनातील तयारी सुरूआहे. सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच प्रवेश पासेस उपलब्ध करून देण्याचे कामही सुरू झाले आहे. मुंबईहून जवळपास ३५० च्या जवळपास कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. दस्तऐवज, फाईल्स, पुस्तके, कॉम्प्युटर आदी लावण्याचे काम सुरू झाले आहे. शनिवार आणि रविवार सुटी आहे. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण साहित्य लावण्याचे काम केले जाईल. त्यामुळे सोमवारपासून सचिवालयाच्या कामकाजास सुरुवात होण्याची शक्यता आहे.