शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण लेखकांना प्रकाशनाबाबत मार्गदर्शनाची गरज

By admin | Updated: January 7, 2015 01:01 IST

ग्रामीण भागात अनेक लोक मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती करीत आहेत. त्यांचे अनुभव आणि त्यातून आलेले साहित्य एकूणच ग्रामीण जीवनाचे प्रश्न, वेदना, अस्वस्थता आणि सत्य मांडणारे आहे.

प्रभू राजगडकर : लेखन-प्रकाशन व्यवहार कार्यशाळा नागपूर : ग्रामीण भागात अनेक लोक मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती करीत आहेत. त्यांचे अनुभव आणि त्यातून आलेले साहित्य एकूणच ग्रामीण जीवनाचे प्रश्न, वेदना, अस्वस्थता आणि सत्य मांडणारे आहे. पण ग्रामीण लेखकांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी साधने नाही, माहिती नाही आणि माध्यमेही त्यांच्यापर्यंत हव्या त्याप्रमाणात पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांचे साहित्य कसदार आणि वेगळे अनुभव मांडणारे असताना ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी खेड्यापाड्यात लिहिणाऱ्या लोकांना त्यांचे साहित्य प्रकाशित कसे करावे, याचे मार्गदर्शन देण्याची नितांत गरज असल्याचे मत ज्येष्ठ कवी प्रभू राजगडकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन-प्रकाशन व्यवहार कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे, मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर, संयोजक डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. ग्रामीण भागात युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक लेखनातून आपली ऊर्मी व्यक्त करीत आहेत.साप्ताहिक आणि रविवारच्या पुरवण्यांमध्ये त्यांना स्थान मिळत नाही. इंटरनेटही त्यांच्या आवाक्यात नाही. यात साहित्य कसे प्रकाशित करावे, याचे मार्गदर्शन त्यांना मिळाले तर मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू होईल, असे राजगडकर म्हणाले. यावेळी डॉ. मुनघाटे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका आणि महत्त्व विशद केले. डॉ. अक्षयकुमार काळे यांनी प्रकाशकांचे त्यांना आलेले अनुभव मिश्किल शैलीत सांगितले.उद्घाटनानंतर ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर यांनी पहिल्या सत्रात सहभागी लेखकांना लेखनाची मुद्रणप्रत, प्रकाशकाशी व्यवहार, स्वयंप्रकाशन, त्याचे अर्थकारण, प्रकाशकाशी करार, आयएसबीएन क्रमांक, पुस्तकाचे वितरण, प्रसिद्धी, जाहिरात आदी विषयांवर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी सहभागी लेखकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. प्रा. महेश जोगी आणि संजीवनी ठाकरे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. (प्रतिनिधी)