शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव येथील ग्रामविकास अधिकारी निलंबित

By admin | Updated: August 20, 2016 02:31 IST

सावनेर पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवय मुख्यालय सोडण्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी

परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे भोवले : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी केली कारवाई खापरखेडा : सावनेर पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवय मुख्यालय सोडण्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सावनेर तालुक्यातील दहेगाव (रंगारी) येथील ग्रामविकास अधिकारी आर. एस. औतकर यांच्यावरिुद्ध निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आर. एस. औतकर यांची दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारीपदी नियुक्ती केली होती. सावनेरचे खंडविकास अधिकारी माणिक हिमाने यांनी औतकर यांना त्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिले होते. मध्यंतरी हिमाने यांनी दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, औतकर अनुपस्थित होते. परिणामी, हिमाने यांनी औतकर यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केली. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान औतकर दोषी असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी औतकर यांना निलंबित केले. त्यांच्याकडून दहेगाव (रंगारी) ग्रामपंचायतचा कार्यभार काढून घेण्यात आला असून, पोटा ग्रामपंचायतचे सचिव विजय पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. दहेगाव (रंगारी) येथे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ६०० रोपट्यांची लागवड करण्यात आली असून, यात १ लाख ५२ हजार ४८६ रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप किशोर चौधरी यांनी केला. चौधरी यांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय समितीची नियुक्ती केली. या प्रकरणात खंडविकास अधिकारी माणिक हिमाने दोषी असल्याने प्रकरणाची चौकशी पूर्ण होईस्तव हिमाने यांना निलंबित करण्याची मागणी किशोर चौधरी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)