शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओचे पाऊल पडते मागे!

By admin | Updated: March 14, 2015 02:45 IST

राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना गेल्या चार महिन्यांपासून ...

नागपूर : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना गेल्या चार महिन्यांपासून वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून दिले जात आहे. विशेष म्हणजे, आरसीबुक आॅप्टिकल स्मार्ट कार्ड स्वरूपात तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खासगी कंपनी ‘शाँग’शी करार संपला. सहा महिन्यांसाठी दिलेली मुदतवाढही संपली. परंतु दहा महिन्यांवर कालावधी होऊनही परिवहन विभागाने कुठलीही हालचाल न केल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. राज्यभरात एक लाख आरसी प्रलंबित असल्याची माहिती आहे.नवीन नोंदणी झालेल्या वाहनांना आरटीओ कार्यालयातर्फे पूर्वी आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात दिले जात होते. मात्र, ते सांभाळणे खूप जिकिरीचे होते. तंत्रज्ञानातील बदल ओळखून परिवहन विभागाने २००६ मध्ये ‘शाँग’ या खासगी कंपनीला आरसी बुक स्मार्ट कार्डच्या स्वरूपात तयार करून देण्याचे कंत्राट दिले. जून २०१४ मध्ये हे कंत्राट संपले. या कंत्राटदाराला दिलेली सहा महिन्यांची मुदतवाढही नोव्हेंबर अखेरीस संपली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या तारखेपासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. परंतु आरटीओकडे आधीच तोकडे मनुष्यबळ असताना या नव्या कामाची भर पडल्याने दिवसाकाठी सुमारे ३० आरसी बुक कागदी पुस्तिकेच्या स्वरूपात तयार होत आहे. पूर्वी स्मार्ट कार्डच्या स्वरूपात हेच आरसीबूक शंभरावर तयार व्हायची. गेल्या चार महिन्यांपासून आरसीची प्रलंबित संख्या वाढून राज्यभरात १ लाखाच्यावर गेल्याची माहिती आहे. परिणामी राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणीधारकांमध्ये संताप आहे.(प्रतिनिधी)