शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यातील काचबिंदूचा धोका आधीच कळणार

By admin | Updated: March 12, 2016 03:26 IST

देशात दरवर्षी तब्बल सहा हजार लोक काचबिंदूमुळे दृष्टी गमावून बसतात. हजारांमधून ८९ जणांना हा आजार अचानक येतो, त्यात ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे.

नेत्ररोग विभाग : ‘अ‍ॅटोमेटेड पेरीमीटर’, ‘डायओडे लेझर’ उपकरण येणारनागपूर : देशात दरवर्षी तब्बल सहा हजार लोक काचबिंदूमुळे दृष्टी गमावून बसतात. हजारांमधून ८९ जणांना हा आजार अचानक येतो, त्यात ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे. या दृष्टिचोर काचबिंदूपासून सावध राहण्यासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाने ‘अ‍ॅटोमेटेड पेरीमीटर’ हे उपकरण विकत घेतले आहे. सुमारे ३९ लाखाचे हे उपकरण एप्रिल महिन्यात स्थापन होणार आहे. विशेष म्हणजे, या उपकरणामुळे भविष्यात काचबिंदू होणार की नाही ते कळते. या उपकरणासोबतच ४३ लाखाचे ‘डायओडे लेझर’ हे अत्याधुनिक उपकरणही रुग्णसेवेत असणार आहे.काचिबंदूमध्ये सुरु वातीला फारशी लक्षणे जाणवत नाहीत. किंवा कधी कधी काहीच लक्षणे जाणवत नाहीत आणि कोणतीही पूर्वसूचना न मिळता चोरपावलांनी दृष्टीचा हास होतो. काचबिंदू असणाऱ्या बऱ्याच जणांना आपल्याला काचबिंदू आहे, हे माहितीच नसते. जर काचबिंदूचे निदानच झाले नाही आणि त्यावर उपचारच झाले नाही तर अंधत्व येऊ शकते. त्यामुळे दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा आठवडा हा जनजागृती सप्ताह म्हणून पाळला जातो. मेडिकलच्या नेत्रविभागातही या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ३५० वर रुग्ण उपचारासाठी येतात. यातील १० ते १५ रुग्ण हे काचबिंदूशी संबंधित असतात. परंतु आवश्यक उपकरण नसल्याने अनेकेवळा आजाराचे निदान करणे कठीण जात होते. रुग्णाच्या सोयीसाठी सहा महिन्यांपूर्वी विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी ‘अ‍ॅटोमेटेड पेरीमीटर’ घेण्याचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी लागलीच याला मान्यता देत जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी निधी मंजूर करून संबंधित उपकरणांची खरेदीही केली. हे उपकरण विदर्भच नाहीतर मेडिकलमध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या चार राज्यातील रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. काचबिंदू होणार की नाही हे आजारापूर्वीच कळणार असल्याने त्यावर उपचार करून आजाराला दूर ठेवून अंधत्व टाळता येणार आहे. या उपकरणामुळे काचबिंदूचे निदान, उपचाराचा प्रभावही कळतो. (प्रतिनिधी)