शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

तिखट झाले पुन्हा

By admin | Updated: May 20, 2014 00:56 IST

पावसाच्या अनिश्चिततेमुळे विदर्भचे नव्हे तर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाल मिरचीचे पीक कमी होत असल्याने भाव वधारले आहेत.

 ‘तिखट’ दोन वर्षांत ३० टक्के दरवाढ : मिरचीची आवक कमी

नागपूर : पावसाच्या अनिश्चिततेमुळे विदर्भचे नव्हे तर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाल मिरचीचे पीक कमी होत असल्याने भाव वधारले आहेत. परिणामी स्वयंपाकघरात दैनंदिन उपयोगात येणारे तिखटाचे भाव ३० टक्क्यांनी वाढल्याने ते पुन्हा ‘तिखट’ झाले आहे. घरच्या घरी लाल मिरचीपासून तिखट तयार करण्याचे दिवस आता नाहीत. नामांकित कंपन्यांनी तयार केलेली उत्पादने खरेदीकडे गृहिणींचा कल वाढला आहे. बाजारात तिखटाचे भाव प्रति किलो २०० रुपयांवर आहेत. दोन वर्षांआधी भाव १४० ते १५० रुपयादरम्यान होते. जास्त लालसर आणि तिखटपणा असलेले भिवापुरी मिरचीचे तिखट खास दर्जानुसार प्रति किलो २५० रुपयांवर गेले आहे. वाघमारे मसाले कंपनीचे संचालक प्रकाश वाघमारे यांनी सांगितले की, कळमना बाजारात मिरचीचे प्रति किलो दर दर्जानुसार ७० ते ८५ रुपयादरम्यान आहेत. याशिवाय कर्नाटक येथील बेडगी मिरची १५० रुपये किलो विकली जाते. मिरचीच्या दर्जानुसार तिखट तयार होते. कंपनी गुणवत्तेवर भर देत असल्याने वाघमारे तिखटाला बाजारात मागणी आहे. भिवापुरी लाल मिरचीला सर्वत्र मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. कळमन्यातून मिरचीची निर्यात विदर्भातील मोठे निर्यातदार प्रकाश वाधवानी यांनी सांगितले की, कळमना लाल मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. दर सोमवारी लिलाव होतो. यादिवशी ५० ते ६० हजार पोत्याची (प्रति पोते ४० कि़) आवक असते. मार्च आणि एप्रिलमध्ये सर्वाधिक आवक असते. १५ दिवसांआधी ५० हजार पोते यायचे. सध्या सिझन नसल्याने आवक १० ते १२ हजार पोते आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर ही देशातील मोठी बाजारपेठ ५ जूननंतर सुरू झाल्यानंतर आवक वाढेल. सर्व माल स्टोरेजमधील राहील. गुंटूरमध्ये दरवर्षी ६० ते ६५ लाख पोत्यांचा स्टॉक असतो. पण यंदा उत्पादन कमी झाल्याने स्टॉक ४५ ते ४७ लाख पोत्यांपर्यंत कमी झाला आहे. प्रति किलो दर ६५ ते ८० रुपयादरम्यान आहेत. जगात सर्वात मोठा निर्यातदार चीन देश सध्या मिरचीची आयात करीत आहे. विदर्भातून युरोप, अमेरिका, मध्यपूर्व देश, मलेशिया, सिंगापूर देशांमध्ये लाल मिरचीची निर्यात होत असल्याचे वाधवानी म्हणाले. काही कारणांमुळे गेल्या १५ दिवसांपासून संयुक्त अमिरात देशांमध्ये निर्यात बंद आहे. बोलणी सुरू आहे. निर्यात सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)