शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विधी विद्यापीठ कुलगुरू निवडीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 17, 2015 03:04 IST

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीत कायदेशीर तांत्रिक बाधा निर्माण झाली होती.

योगेश पांडे नागपूरमहाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीत कायदेशीर तांत्रिक बाधा निर्माण झाली होती. विधिमंडळात विधी विद्यापीठ अधिनियम, २०१४ चे सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही तांत्रिक अडचण अखेर दूर झाली असून कुलगुरू निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात लवकरच प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना नागपुरात होण्याची घोषणा झाल्यानंतर यासंदर्भात २०१४ साली कायदादेखील तयार करण्यात आला होता. परंतु तरीदेखील प्रत्यक्ष विद्यापीठ सुरू होण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली दिसून येत नव्हत्या. विधी विद्यापीठाचे काम कधीच सुरू व्हायला हवे होते. परंतु यातील कायद्याच्या वाक्यरचनेमुळे कायदेशीर तांत्रिक त्रुटी निर्माण झाली होती. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या कायद्यात संबंधित विद्यापीठाचा कुलगुरू त्याच विद्यापीठातील असावा अशी ही वाक्यरचना होती. परंतु हे विद्यापीठच अस्तित्वात नसल्याने या नियमांनुसार पात्र कुलगुरू कुठून येणार असा प्रश्न उभा ठाकला होता. यामुळे या विद्यापीठाची पदभरतीच रखडली होती.ही तांत्रिक चूक लक्षात आल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढाकार घेत या विधेयकात सुधारणा करण्यासाठी विधेयकाचा मसुदा तयार केला. या मसुद्यात विधेयकातील कलम २८ च्या पोट कलम (३) मध्ये कुलगुरूपदाच्या अर्हतेत बदल करण्यात आला. यानुसार कुलगुरू महाविद्यालयात विधी प्राध्यापक असेल किंवा विद्यापीठात विधी प्राध्यापक असेल असे नमूद करण्यात आले. हे विधेयक सोमवारी विधानसभेत मांडण्यात आले व त्यानंतर मंगळवारी विधान परिषदेत सादर करण्यात आले. दोन्ही सभागृहांनी या विधेयकातील सुधारणेला एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे आता तांत्रिक घोळ दूर झाला असून कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.