फळांना श्रीमंती!

By Admin | Updated: May 14, 2014 00:41 IST2014-05-14T00:41:21+5:302014-05-14T00:41:21+5:30

सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वत्न वातावरण तापू लागले असून अंगाची नुसती लाहीलाही होऊ लागली आहे. वाढत्या उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी उन्हाळी हंगामात जसा पेहरावात बदल....

Rich in fruit! | फळांना श्रीमंती!

फळांना श्रीमंती!

आंब्याची आवक वाढली : किरकोळमध्ये प्रचंड भाव

नागपूर : सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वत्न वातावरण तापू लागले असून अंगाची नुसती लाहीलाही होऊ लागली आहे. वाढत्या उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी उन्हाळी हंगामात जसा पेहरावात बदल केला जातो अगदी तसाच वाढत्या तहानेला शमविण्यासाठी विविध पेय व फळांचे सेवन वाढते. आंब्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात फळांची आवक फारच कमी असल्याने किमती आकाशाला भिडल्या आहे. सध्या फळे श्रीमंतांचीच झाली आहेत.

बाजारपेठेत फेरफटका मारल्यास जागोजागी शीतपेयांसहीत फळ-फळावळांची दुकाने थाटलेली दिसतात. वाढत्या उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून ग्राहक फळे आणि फळांच्या रसाला प्राधान्य देत आहेत. कळमन्यात उन्हाळ्यात आंब्याव्यतिरिक्त फळांची आवक कमी असल्याने किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. बाजारात उन्हाळी फळांची रेलचेल वाढू लागली आहे.

कळमना ठोक बाजारात विशिष्ट मोसमात संबंधित फळांची आवक जास्त असतानाही किरकोळ बाजारात जास्त भावातच विकली जातात. सर्वच फळांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. कळमना आणि किरकोळमधील दरात फार मोठी तफावत असते. ती दूर करण्याची ग्राहकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rich in fruit!