शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

महसूल दस्तावेज राहणार सुरक्षित

By admin | Updated: November 23, 2014 00:38 IST

अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने संग्रहित करून ठेवलेले महसूल दस्तावेज नष्ट होण्याचा धोका असल्याने त्याच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अत्याधुनिक अशी ‘रेकॉर्ड रूम’तयार

जिल्हाधिकारी कार्यालयात अद्ययावत रेकॉर्ड रूम : ‘कॉम्पॅक्टर’ लागलेनागपूर: अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने संग्रहित करून ठेवलेले महसूल दस्तावेज नष्ट होण्याचा धोका असल्याने त्याच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अत्याधुनिक अशी ‘रेकॉर्ड रूम’तयार करण्याचे काम सुरू आहे. लॉकर्सप्रमराणे ‘कॉम्पॅक्टर’ तेथे लावण्यात येत असून त्यात ही कागदपत्रे सुरक्षित ठेवली जाणार आहेसेतू केंद्राच्या पहिल्या मजल्यावर रेकॉर्ड रूमचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तेथे कागदपत्रे ठेवण्यासाठी कॉम्पॅक्टर लावण्यात येत असून आतापर्यंत ६० कॉम्पॅक्टर बसविण्यात आले आहेत. त्यात सर्व महसूल दस्तावेज तारीख, वर्ष आणि विभागनिहाय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ती गहाळ होणे किंवा नष्ट होणे याबाबी पुढच्या काळात उद््भवण्याचा धोका नाही.महसूल खात्याशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे एक तर गहाळ झालेली असतात किंवा गहाळ तरी केली जातात. अनेक वर्षांपासून धूळखात पडलेली असल्याने ते नष्ट होण्याचाही धोका असतो. त्यामुळेच गत आघाडी शासनाच्याच काळात महसूल दस्तावेजचे स्कॅनिंग करून ते सुरक्षित ठेवण्याबाबत निर्देश प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले होते.या कामाची प्राथमिक स्वरूपाची तयारी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सुरू केली होती. विद्यमान जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी या कामाला गती दिली. सध्या ते अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा राजस्व अभिलेखा कार्यालयाचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)२००६ पासूनची सर्व महत्त्वाच्या दस्तावेजचे स्कॅनिंग करून ते तारीखनिहाय या रेकॉर्ड रूममधील कॉम्पॅक्टरमध्ये ठेवली जातील. त्यामुळे ती सुरक्षित राहतील व गरज पडली तेंव्हा सहज उपलब्ध होईल.आतापर्यंत ही कागदपत्रे पारंपारिक पद्धतीने म्हणजे गठ्ठे बांधून ठेवली जात होती. त्यावर धूळ बसत असल्याने तसेच पावसाळ्यात पाणी पडत असल्याने नष्ट होण्याचा धोका संभवत होता.दस्तावेज स्कॅन केले जातील व त्यानंतर निश्चित पद्धतीनुसार ते संग्रहित केले जातील. त्यासाठी कामाला सुरुवात झाली आहे.सेतू केंद्रातील विविध प्रमाणपत्रांशी संबंधित सर्व कागदपत्रेही या रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात येणार असून त्यासाठी २००६पासूनची कागदपत्रे वर्ष व तारीखनिहाय लावून ठेवण्यात आली आहेत.महसूल दस्तावेज स्कॅन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली असून यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे.