शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्तीचे २.४६ लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तक्रारकर्त्या महिलेचे २ लाख ४६ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तक्रारकर्त्या महिलेचे २ लाख ४६ हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने न्यू ऑरेंज सिटी रियल कॉन या फर्मला दिला आहे. तसेच तक्रारकर्त्या महिलेला शारीरिक व मानसिक त्रासाकरिता २५ हजार रुपये व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाईही मंजूर केली आहे. ही रक्कम संबंधित फर्मनेच द्यायची आहे.

धनेश्वरी आडे असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव असून, त्यांची तक्रार आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी निकाली काढली. संबंधित रकमेवर १५ मे २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. तसेच या आदेशाचे एक महिन्यात पालन करण्यात अपयश आल्यास पुढील कालावधीत रोज २५ रुपये अतिरिक्त नुकसानभरपाई लागू होईल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या तक्रारीतील माहितीनुसार, आडे यांनी न्यू ऑरेंज सिटी रियल कॉनच्या मौजा शिरपूर (ता. कामठी) येथील ले-आऊटमधील एक भूखंड २ लाख ४६ हजार रुपयांना खरेदी करण्यासाठी ७ जुलै २०१४ रोजी करार केला. त्यानंतर आडे यांनी फर्मला वेळोवेळी संपूर्ण रक्कम अदा केली. परंतु, फर्मने आडे यांना भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही तसेच आडे यांची रक्कमही परत केली नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली होती. ग्राहक आयोगाने फर्मला बजावलेली नोटीस परत आली. फर्मच्यावतीने कुणीही आयोगासमक्ष हजर झाले नाही. त्यामुळे आडे यांच्या तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही करून निर्णय देण्यात आला.

------------------

विक्रीपत्र करून देण्यास उदासीन

न्यू ऑरेंज सिटी रियल कॉन हे ग्राहकांकडून रक्‍कम घेण्‍याबाबतीत नेहमीच तत्‍पर असतात, असे रेकॉर्डवरून दिसून येते. परंतु, त्यानंतर ते भूखंड विकसित करणे व विक्रीपत्र नोंदवून देण्‍याबाबत तातडीने कृती करत नाहीत. याबाबत ते उदासीन असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्तीच्‍या आरोपानुसार त्यांनी विक्रीपत्र नोंदवून मागितले असता, फर्मचे भागिदार टाळाटाळ करत होते. तसेच वारंवार पुढील तारीख देत होते, असे निरीक्षण आयोगाने निर्णयात नोंदवले.