शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
5
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
6
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
7
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
8
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
9
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
10
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
11
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
14
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
15
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
16
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
17
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
18
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
19
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
20
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालयांमधील दलालीला लागणार लगाम

By admin | Updated: May 10, 2014 23:50 IST

वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना हवा आहे? मग दलालाच्या हातात ३०० रुपये द्या आणि कोणतीही चाचणी न देता परवाना मिळवा,

मनोज ताजने - गोंदिया

वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना हवा आहे? मग दलालाच्या हातात ३०० रुपये द्या आणि कोणतीही चाचणी न देता परवाना मिळवा, हीच पद्धत आतापर्यंत राज्यातील बहुतांश आरटीओ कार्यालयांमध्ये सुरू होती. पण आता याला लगाम बसणार आहे. शिकाऊ परवाना मिळवू इच्छिणार्‍या प्रत्येकाला आता संगणकीय चाचणीतून जावे लागणार आहे. त्यासाठी एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेशन कॉर्पोरेशन) या सरकारी कंपनीने विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. प्रथम पुणे जिल्ह्यातील बारामती येथे पायलट प्रोजेक्ट म्हणून या संगणकीय चाचणीला सुरूवात करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ही प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. आतापर्यंतच्या कार्यपद्धतीत कोणीही नवखा उमेदवार शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी परिवहन विभागाच्या कार्यालयात गेला आणि त्याने सर्व सोपस्कार पूर्ण केले तरी तो जर दलालामार्फत आला नाही तर त्याला कठीण प्रश्न विचारून परिवहन निरीक्षक नापास केल्याशिवाय राहात नव्हते. त्यामुळे परवाना हवा असेल तर दलालामार्फत जाणे हा अलिखित नियमच झाला होता. त्यात अधिकार्‍यांचेही अर्थपूर्ण संबंध राहात होते. पण आता संगणकीय चाचणीत उमेदवाराला वाहतुकीच्या नियमांची किती जाण आहे हे स्पष्टपणे दिसणार आहे. या आठ मिनिटांच्या चाचणीत उमेदवाराला १६ प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर देण्यासाठी तिथे काही पर्याय सुद्धा दिलेले असतील. योग्य पर्यायासमोर ‘क्लिक’ करण्यासाठी केवळ ३० सेकंदाचा वेळ दिला जातो. त्या वेळात उत्तर दिले नाही तर तो प्रश्न मिटून दुसरा प्रश्न समोर येतो. अशा पद्धतीने दिलेल्या वेळेत १६ पैकी किमान ९ प्रश्नांची उत्तरे (६० टक्के) बरोबर देणारा या चाचणीत उत्तीर्ण होतो. वाहतूक निरीक्षकाच्या देखरेखीत ही चाचणी होत असली तरी त्या कक्षाचे सीसीटीव्ही कनेक्शन सहायक परिवहन अधिकार्‍यांच्या टेबलवर असल्यामुळे ते आपल्या कक्षातूनच सर्वांवर नजर ठेऊ शकतात.