शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कोविड हॉस्पिटलचे ऑक्सिजन सिलिंडरच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 07:00 IST

Nagpur news मागील तीन महिन्यांपासून मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करणारा २० हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन प्लांट मंजुरीपासून अद्यापही दूर आहे. परिणामी आजही येथील रुग्णांना सिलिंडरमधूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्दे२० हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन प्लांट अडकला कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. तुटवडा पडू नये म्हणून स्वत: जिल्हाधिकाऱ्यांना त्यात लक्ष घालावे लागले होते. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आजही पुरवठा व मागणीवर लक्ष ठेवून आहे. असे असताना, मागील तीन महिन्यांपासून मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवठा करणारा २० हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन प्लांट मंजुरीपासून अद्यापही दूर आहे. परिणामी आजही येथील रुग्णांना सिलिंडरमधूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर सामान्यत: रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. विशेषत: मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या अनेक रुग्णांचे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यांचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन थेरपी हा एक महत्त्वाचा दुवा ठरतो. म्हणूनच मेडिकलमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या प्रत्येकी ६०० खाटांजवळ ऑक्सिजनची सोय करण्यात आली. जम्बो सिलिंडरच्या माध्यमातून पाउप लाइनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ही प्रक्रिया स्वयंचलित असली तरी कधीही धोका होण्याची शक्यता असते. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात २० हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांत प्लांटचे कामही पूर्ण झाले; परंतु कंत्राटदाराने पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्सप्लोसिव्ह विभागाकडून अद्यापही मंजुरीच घेतली नाही. यामुळे तीन महिन्यांपासून प्लांट बंद पडला आहे.

-कोरोना संकटात मागणी होती अधिक

कोरोना संसर्ग वाढीस असताना ५५ टक्के ऑक्सिजन लागत होता. मात्र, आता हे प्रमाण जवळपास ३८ टक्क्यांवर आले आहे; परंतु अलीकडे पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली अहे. मेडिकलमध्ये सद्य:स्थितीत कोरोनाचे १५८ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ६० टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस