शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

१६० खोल्यांच्या गाळे परिसराला घाण आणि दुर्गंधीपासून दिलासा; सार्वजनिक बांधकाम विभाग सक्रिय

By आनंद डेकाटे | Updated: November 8, 2025 20:29 IST

Nagpur : सिव्हिल लाईन्समधील १६० खोल्यांच्या गाळे परिसर सीवर लाईनला जोडलेलाच नाही. इतकेच नव्हे तर तिथे सेप्टिक टँकच नाही. परिणामी, येथे राहणाऱ्या २०० कुटुंबांचे मलमूत्र पाईपच्या माध्यमातून थेट नाल्यात सोडले जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी वापरल्या जाणाऱ्या १६० खोल्यांच्या गाळे परिसराला अखेर घाण आणि दुर्गंधीपासून दिलासा मिळणार आहे. येथे राहणाऱ्या सुमारे २०० कुटुंबांचे मलमूत्र आता थेट नाल्यात सोडले जाणार नाही. परिसरात बायो डायजेस्टर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सेप्टिक टँक देखील बांधण्यात येणार आहे.  सिव्हिल लाईन्समधील १६० खोल्यांच्या गाळे परिसर सीवर लाईनला जोडलेलाच नाही. इतकेच नव्हे तर तिथे सेप्टिक टँकच नाही. परिणामी, येथे राहणाऱ्या २०० कुटुंबांचे मलमूत्र पाईपच्या माध्यमातून थेट नाल्यात सोडले जात होते. ‘लोकमत’ने ७ नोव्हेंबरच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. विधानमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सुमारे १२०० कर्मचारी येथे वास्तव्यास असतात आणि त्यांच्याही मलनिस्सारणाची हीच व्यवस्था असल्याचे यावरून स्पष्ट झाले होते. 

या वृत्तामुळे पीडब्ल्यूडीमध्ये खळबळ उडाली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि विशेषतः सिव्हिल लाईन्स परिसर झकपक करण्याचे प्रयत्न करणाऱ्या विभागाची पोल उघड झाली. विशेष म्हणजे, २०१४ मध्ये बांधलेल्या चार इमारतींमध्येही घाण व्यवस्थापनाची कोणतीही सोय नाही, हे समोर आले. पाईप लाईनद्वारे थेट मलनिस्सारण नाल्यात टाकले जात असल्याचे समजल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हालचाल सुरू केली. 

अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांनी सांगितले की, लवकरच येथे सेप्टिक टँक उभारण्यात येणार आहे. दरम्यान, सल्लागारांच्या मदतीने परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर निर्णय घेण्यात आला की प्रथम बायो डायजेस्टर बसविला जाईल. या कामावर सुमारे २ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर दीर्घकालीन उपाय म्हणून किचन आणि शौचालयातील सांडपाणी वेगळे करून सेप्टिक टँक बांधण्यात येईल.

एसटीपीचे काय झाले?

गाले परिसरात आधीपासूनच बॅरक आहेत. येथे २०१४ मध्ये चार इमारती बांधल्या गेल्या. दहा वर्षांनंतर म्हणजे २०२४ मध्ये १०० केएलडी क्षमतेच्या एसटीपी (सीवरेज ट्रीटमेंट प्लांट) उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सर्वेक्षणानंतर सुमारे २.५ कोटी रुपयांचा अंदाजपत्रक तयार झाले. मात्र सध्या पीडब्ल्यूडीने या प्रकल्पाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. विभाग सध्या तात्पुरत्या उपाययोजनांवरच भर देत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Relief from Filth for 160-Room Complex; Public Works Department Active

Web Summary : The 160-room Nagpur complex, plagued by sewage issues, will get relief. Bio-digesters and septic tanks are being installed after a report highlighted direct sewage discharge into drains. A permanent sewage treatment plant is planned, with temporary fixes prioritized now.
टॅग्स :nagpurनागपूर