शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मॅट्रिक्सच्या संचालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: July 30, 2015 02:47 IST

नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अन्य शहरात टाऊनशिप उभारण्याचे आमिष दाखवून अनेकांची २ कोटी ३१ लाख ८१ हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या

टाऊनशिपचे आमिष : कोट्यवधींनी फसवणूकनागपूर : नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अन्य शहरात टाऊनशिप उभारण्याचे आमिष दाखवून अनेकांची २ कोटी ३१ लाख ८१ हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या धंतोलीच्या आशा टॉवरस्थित मॅट्रिक्स इन्फ्राइस्टेटच्या एका संचालकाचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. विजय त्रिलोकचंद वर्मा रा. रघुकुल सहा उज्ज्वलनगर, असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात डॉ. सुचितकुमार दिवाण रामटेके, विजय वर्मा यांच्यासह १२ आरोपी आहेत. अमरावती येथील कैलास भीमराव पाटील (४८) यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी १८ जुलै २०१५ रोजी या सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींनी धंतोली येथे आपले कार्यालय उघडल्यानंतर विविध शहरात टाऊनशिप, डेव्हलपमेंट हाऊसिंग स्किम, व्यापारी संकूल आणि इतर रहिवासी बांधकाम उभारले जात असल्याबाबतच्या जाहिराती वृत्तपत्रातून प्रसिद्ध केल्या होत्या. ठिकठिकाणी प्रॉपर्टी शो आयोजित केले होते. जाहिरातीनुसार कैलास पाटील आणि इतरांनी या कंपनीच्या वानाडोंगरी येथील १.२७ हेक्टर जागेवरील रॉयल टाऊनशिप स्कीममध्ये फ्लॅट, दुकान, रो हाऊस रोख रकमेचा भरणा करून बुक केले होते. सर्व व्यवहाराचे अ‍ॅग्रीमेंट करून १८ महिन्यात बांधकाम पूर्ण करून जागेचा ताबा देण्याचे कंपनीकडून कबूल करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कंपनीने वानाडोंगरीची ही जमीन खरेदीच केली नव्हती. संबंधित जिल्हाधिकारी, नगररचना, नासुप्र आदी शासकीय कार्यालयांकडून परवानगीही घेतली नव्हती. ही बनवाबनवी लक्षात येताच लोकांनी आपले पैसे परत मागितले असता त्यांना पैसेही परत करण्यात आले नाही. त्यांची फसवणूक करण्यात आली. आजपर्यंत ७५ जणांनी तक्रारी केल्या असून तक्रारींचा ओघ वाढत आहे. लोकांनी ६५ हजार ते ९ लाखपर्यंतच्या रकमांचा या कंपनीत भरणा केला आहे. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर, प्रशांत साखरे, लीलाधर शेंद्रे यांनी तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सागर आशिरगडे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस उपनिरीक्षक के. एन. गड्डिमे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)