शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: January 5, 2017 02:26 IST

करंटवाला मोरपंखाच्या विक्रीत मोठी दलाली मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका फर्निचर व्यवसायिकाची १३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप

करंटवाला मोरपंखाच्या नावे १३ लाख ५० हजाराने फसवल्याचे प्रकरण नागपूर : करंटवाला मोरपंखाच्या विक्रीत मोठी दलाली मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका फर्निचर व्यवसायिकाची १३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या मुंबई सांताक्रूझ येथील एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांचे न्यायालयाने फेटाळून लावला. जसीम अहमद अन्सारी (४१), असे आरोपीचे नाव असून तो मूळचा इंदूर येथील रहिवासी असून हल्ली मुक्काम त्याचा सांताक्रूझ येथे आहे. अखिलेश रामजी पांडे , असे फसवणूक झालेल्या फर्निचर व्यवसायिकाचे नाव असून ते निपाणी सोनेगाव येथील रहिवासी आहेत. या फसवेगिरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २८ डिसेंबर २०१६ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ११४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुकेश ऊर्फ हिरालाल रतनलाल गजभिये (४२) रा. बारसेनगर अटक करण्यात आलेली आहे. त्याचा बुधवार ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड होता. जसीन मोहम्मद अन्सारी, राजू खान, संतोष यादव आणि माजीद खान हे या प्रकरणातील पाहिजे असलेले आरोपी असून त्यापैकी जसीन याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. प्रकरण थोडक्यात असे की, मुकेश गजभिये हा १६ आॅगस्ट २०१६ रोजी पांडे यांच्या दुकानात गेला होता. त्याने स्वत:चा परिचय मुंबईच्या जेजे ग्रुप आॅफ कंपनीचा को-आॅर्डिनेटर, असा करून दिला होता. जसीम अन्सारी हा या कंपनीचा प्रबंध व्यवस्थापक असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने पुढे असेही सांगितले होते की, राजू खान आणि संतोष यादव यांच्याकडे करंटवाला मोरपंख आहे. त्याचे व्हिडिओही त्याने दाखवले. हा मोरपंख खुद्द आमची कंपनीच २०० कोटी रुपयांमध्ये विकत घेणार आहे. ही कंपनी थेट पार्टीसोबत सौदा करीत नाही, मध्यस्थामार्फत ती सौदा करीत असते. या सौद्यात मध्यस्थाला १५ टक्के कमिशन दिले जाणार आहे. या सौद्यासाठी मुकेशने पांडे आणि त्यांच्या मित्रांना लखनौ येथे नेऊन एका बड्या हॉटेलमध्ये थांबवले होते. या ठिकाणी त्याने आणखी एक आरोपी माजीद खानची मोरपंखाचा टेस्टर म्हणून ओळख करून दिली होती. राजू आणि संतोष यांच्याकडून पंख घेऊन तो माजीदने टेस्ट करून करंट असल्याचे सांगितले होते. आरोपींनी पांडे यांना विश्वासात घेऊन मुव्हमेंट अमाऊंटच्या नावाखाली १२ लाख ५० हजार आणि टेस्टिंगच्या वेळी राजू खान आणि संतोष यादव यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये घेतले होते. एकूण १३ लाख ५० हजार रुपयांनी आरोपींनी पांडे यांची फसवणूक केली. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी. एम. काळे हे आहेत.(प्रतिनिधी)