शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत करता येईल दस्तनोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : दस्तनोंदणीसाठी गर्दी करू नका लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्कात शासनाने वेळोवेळी ...

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : दस्तनोंदणीसाठी गर्दी करू नका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुद्रांक शुल्कात शासनाने वेळोवेळी सवलत दिली आहे. त्या सवलतीनुसार मार्च २०२१ अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नोंदणी अधिनियमाच्या कलम २३ नुसार दस्त निष्पादित झाल्यापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतील. तरी ‘कोविड १९’चा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता वरील तरतुदीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक, नागपूर यांनी कळविले आहे.

दुय्यम निबंधक कार्यालयात अलीकडे गर्दी वाढली होती. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका होता. ‘लोकमत’ने या विषयाकडे २५ मार्चच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत ३१ मार्चपर्यत असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरिता नागपूर ग्रामीणमधील १२ दुय्यम निबंधक कार्यालयात सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. मार्च २०२१ मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून दस्त निष्पादित केल्याच्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येईल. तरी कोविड १९चा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता वरील तरतुदीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक, नागपूर यांनी केले आहे.