शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीची पहिल्याच दिवशी ४० लाखांची वसुली

By admin | Updated: June 17, 2016 03:17 IST

महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने थकीत पाणीपट्टीच्या ५० टक्के रक्कम एकमुस्त भरून बिलाची पाटी कोरी करण्याची मोहीम सुरू केली आहे.

५० टक्के सवलत : ८१८ उपभोक्त्यांची बिलाची पाटी कोरी नागपूर : महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने थकीत पाणीपट्टीच्या ५० टक्के रक्कम एकमुस्त भरून बिलाची पाटी कोरी करण्याची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी शहरातील ८१८ उपभोक्यांनी ४० लाख ४५ हजार १२६ रुपयांची थकबाकी भरून बिलाची पाटी कोरी केल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर, गिरीश देशमुख आदी उपस्थित होते.अनेक ग्राहकांच्या पाणी बिलासंदर्भात तक्रारी होत्या. काहींना सरासरीच्या तुलनेत अधिक बिल पाठविण्यात आले होते. काहींनी नवीन बांधकाम केले. कुठे दुसरीकडे वास्तव्यास गेले आहे. तसेच पाण्याचा वापर नसताना अधिक बिल पाठविण्यात आल्याच्या तक्रारींचा यात समावेश आहे. यामुळे थकबाकी वाढत गेली. गेल्या अनेक वर्षापासून ती तशीच कायम आहे. थकबाकीमुळे अनेक उपभोक्त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. नागरिकांच्या सुविधेसाठी जलप्रदाय विभागाने मर्यादित कालावधीसाठी ही योजना आणल्याची माहिती दटके यांनी दिली. जलप्रदाय विभागाच्या आवाहनाला थकबाकीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी शेकडो लोकांनी थकीत बिलासंदर्भात झोन कार्यालयाकडे संपर्क साधून माहिती घेतली. ८१८ उपभोक्त्यांनी एकमुस्त रकमेचा भरणा केला. तडजोडीसाठी उपभोक्यांची गर्दी वाढणार आहे. या योजनेमुळे महापालिका व उपभोक्ते या दोघांनाही लाभ होईल, असा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला. शहरातील ६१ केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ३० जून २०१६ पर्यंत ही योजना राबविली जाणार आहे. महापालिकेच्या झोनस्तरावरील केंद्रांव्यतिरिक्त शहरातील बँक आॅफ महाराष्ट्र, इंडियन बँक व साधना सहकारी बँकेच्या शाखा अशा ६१ ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)