शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कर्मातूनच होते व्यक्तीची खरी ओळख

By admin | Updated: January 28, 2015 01:03 IST

कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्म घेतला यातून व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते तर व्यक्तीचे कर्म आणि त्याच्या वागणुकीतूनच त्याची खरी ओळख पटते. भगवान गौतम बुद्ध

बेल्लनविला विहाराया : गौतम बुद्धांच्या विचारांवर गुंफले विचारपुष्पनागपूर : कुठल्या धर्मात किंवा जातीत जन्म घेतला यातून व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते तर व्यक्तीचे कर्म आणि त्याच्या वागणुकीतूनच त्याची खरी ओळख पटते. भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांमध्येदेखील हेच मानवतावादी मार्गदर्शन दिसून येते, असे मत श्रीलंका येथील श्री जयवर्देनेपुरा विद्यापीठाचे कुलपती प्रा. बेल्लनविला विमलरत्न राजमहा विहाराया यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित डॉ. नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. बुद्ध धम्मातील सामाजिक विचार व तत्त्वज्ञान या विषयावरील व्याख्यानाचे त्यांनी मंगळवारी पहिले पुष्प गुंफले.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेच्या प्रसंगी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे हे प्रामुख्याने उपस्थित होते. गौतम बुद्ध यांनी मानवतेचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. आजच्या युगात त्यांच्या विचारांवर चालणे आवश्यक झाले आहे. गौतम बुद्ध यांना जाती-धर्मांमुळे मनुष्यांमध्ये करण्यात येणारा भेदभाव अमान्य होता. सर्व व्यक्ती समान आहेत हाच संदेश त्यांनी दिला. शिवाय समाजव्यवस्थेत महिलांचे स्थानदेखील पुरुषांच्या बरोबरीचे असल्याचे त्यांचे विचार सांगतात. कुटुंबात पती व पत्नी दोघांचाही दर्जा समान असून त्यांना समान आदर मिळाला पाहिजे अला स्त्री-पुरुष एकतेचा संदेश गौतम बुद्धांच्या शिकवणीतून येतो असे विहाराया यांनी प्रतिपादन केले. बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान स्वातंत्र्य आणि समानतेवर आधारीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच मार्गावर चालून भारतातील कोट्यवधी नागरिकांना समान दर्जा मिळवून दिला. आज इतर धर्म व संप्रदायातील तसेच पाश्चिमात्य देशांतील व्यक्तींनादेखील बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची रुची असून अनेक जण त्याचे धडे घेत आहेत असे विहाराया यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी, विभागांतील प्राध्यापक, कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)