शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा

By admin | Updated: July 29, 2015 03:10 IST

विदर्भात लिंबूवर्गीय फळझाडांवर कोळशीसारख्या विषाणूजन्य आजाराची मोठी समस्या आहे.

सीसीआरआयचा स्थापना दिन : चर्चासत्रात तज्ज्ञांनी मांडले विचारनागपूर : विदर्भात लिंबूवर्गीय फळझाडांवर कोळशीसारख्या विषाणूजन्य आजाराची मोठी समस्या आहे. ही समस्या दूर करणे आवश्यक आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र(सीसीआरआय) ही संशोधन करणारी संस्था आहे आणि येथील वैज्ञानिकांनी मोलाचे काम करीत संशोधन करून अनेक रोगमुक्त प्रजाती तयार केल्या आहेत. मात्र हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे. त्यामुळे वैज्ञानिकांनी उत्पादन नाही तर तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहचवावे, असे आवाहन भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी यांनी केले. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या ३० व्या स्थापना दिनानिमित्त्य मंगळवारी ‘लिंबूवर्गीय फळांवरील विषाणूजन्य आजारांचे आव्हान व भविष्यातील त्यांचे निराकरण‘ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मायी बोलत होते. यावेळी भारतीय कृषी संशोधन केंद्राचे उपमहासंचालक डॉ.पी.के. चक्रवर्ती, जबलपूर येथील कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. एस.एम. पॉलखुराना, प्रो.वाय.एस. अहलावत, सीसीआरआयचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. मायी पुढे म्हणाले की, आपल्या देशात कृषी क्षेत्रात वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचा समाज लवकर स्वीकार करीत नाही. मात्र संशोधकांनी विकसित केलेले तंत्रज्ञान सरकारने लोकांपर्यंत पोहचवावे. एकेकाळी अमेरिकेतही तीच परिस्थिती होती. मात्र आज तेथील संत्रा उत्पादकांचे ट्रापिकाना ज्यूस जगभर विकल्या जातो. विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पादन जगभरात विकले जावे, अशी सदिच्छा डॉ. मायी यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. पॉलखुराना यांनी कृषी संशोधनाच्या क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. लिंबूवर्गीय फळ, पोटॅटो या फळांच्या उत्पादनात सारख्याच समस्या आहेत. संशोधकांनी मेक इन इंडिया, यूज इन इंडिया आणि एक्सपोर्ट टू वर्ल्ड या धर्तीवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिलीप घोष तर आभार प्रदर्शन डॉ. ए.के. दास यांनी केले. (प्रतिनिधी)