नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणामध्ये आरोपी असलेले नवी दिल्ली येथील डॉ. रविंद्रपाल सिंग जसपाल सिंग यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन नाकारून नियमित जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितले. न्यायमूर्तिद्वय बी.व्ही. नागरत्ना व उज्जल भूयान यांनी हा निर्णय दिला.
सिंग यांना सुरुवातीला चंद्रपूर सत्र न्यायालयाने आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात ब्रह्मपुरी पोलिसांनी सिंग यांच्यासह मुख्य सुत्रधार डॉ. क्रिष्णा, एजंट हिमांशू, त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोंविदसामी व सहा सावकारांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. रोशन कुडे, असे किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून ते नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रहिवासी आहेत. कुडे यांनी सावकार प्रदीप बावनकुळेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाकरिता कुडे यांचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे त्यांनी कम्बोडिया येथे किडनी विकली. या रॅकेटमध्ये सिंगसह इतर आरोपी सामील आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सरकारतर्फे वरिष्ठ वकील ॲड. देवेंद्र चव्हाण, तर सिंगतर्फे वरिष्ठ वकील ॲड. सिद्धार्थ लुथरा यांनी बाजू मांडली.
खटल्याला स्थगितीही नाकारली
सिंग यांची या गुन्ह्याच्या खटल्याला अंतरिम स्थगिती देण्याची मागणीदेखील सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केली. यासंदर्भात सिंग यांनी स्वतंत्र याचिका केली होती. पोलिसांनी सत्र न्यायालयामध्ये सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपींविरोधात ठोस पुरावे असल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले.
Web Summary : The Supreme Court rejected Dr. Ravindrapal Singh's anticipatory bail plea in the Chandrapur kidney selling case, directing him to seek regular bail. Allegations involve exploiting farmers into selling kidneys. The court also refused to stay the trial, citing strong evidence against the accused.
Web Summary : सुप्रीम कोर्ट ने चंद्रपुर किडनी बेचने के मामले में डॉ. रविंद्रपाल सिंह की अग्रिम जमानत याचिका खारिज कर दी, और उन्हें नियमित जमानत मांगने का निर्देश दिया। आरोप है कि किसानों का किडनी बेचने के लिए शोषण किया गया। अदालत ने आरोपियों के खिलाफ ठोस सबूत बताते हुए मुकदमे पर रोक लगाने से भी इनकार कर दिया।