नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

By Admin | Updated: June 12, 2014 01:04 IST2014-06-12T01:04:06+5:302014-06-12T01:04:06+5:30

नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून शिक्षणाधिकारी पांडुरंग लक्ष्मण सुरजुसे याने एका विधी पदवीधर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

Rape of a woman by showing bait for job | नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

नागपूर : नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून शिक्षणाधिकारी पांडुरंग लक्ष्मण सुरजुसे याने एका विधी पदवीधर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
पीडित तरुणीने तब्बल एक वर्षानंतर नोंदवलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी ५४ वर्षीय सुरजुसेविरुद्ध भादंविच्या ३७६, ४१६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण असे की, पीडित तरुणी ही एम. ए. आणि एलएल. बीपर्यंत शिकलेली आहे. ती या घटनेपूर्वी शिक्षिकेच्या नोकरीच्या शोधात असताना तिची एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेसोबत ओळख झाली होती.
तिने उपशिक्षणाधिकारी सुरजुसे याच्यासोबत आपली ओळख असल्याचे आणि तुला ते शिक्षिकेची नोकरी लावून देऊ शकतात, असे सांगितले होते. मे २०१३ मध्ये तिने या तरुणीची सुरजुसे याच्यासोबत ओळख करून दिली होती.
सुरजुसे हा प्रौढ शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी असताना त्याने या तरुणीला अनुदानित शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्याने तिला ओळख म्हणून तीन-चार शिक्षण संस्थांमध्येही नेले होते.
तेथील प्रमुखांसोबत नोकरी संदर्भात बातचित केली होती. त्यामुळे ती सुरजुसे याच्यावर प्रभावित झाली होती. एक दिवस चक्क त्याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिला अमरावती मार्गावरील म्हाडा कॉलनी समृद्धी संकुलातील एक फ्लॅटमध्ये नेले. या ठिकाणी त्याने या तरुणीवर बलात्कार केला. ११ मे ते २५ मे २०१३ या काळात त्याने वारंवार पीडित तरुणीवर बलात्कार केला.
तब्बल वर्ष लोटूनही नोकरी मिळाली नाही. शिवाय सुरजुसे याने लग्नही केले नाही. त्यामुळे तिने सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून आपली कर्मकहाणी सांगितली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरजुसे हा आपल्या कुटुंबासह पुणे येथे गेल्याचे पोलिसांची माहिती आहे. काही वर्षांपूर्वी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना आपल्या सापळ्यात अडकवले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rape of a woman by showing bait for job