शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक काॅंग्रेस नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:09 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या रामटेक तालुक्यात नऊपैकी सात ग्रामपंचायतींवर काॅंग्रेस गटाने विजयी ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या रामटेक तालुक्यात नऊपैकी सात ग्रामपंचायतींवर काॅंग्रेस गटाने विजयी पताका फडकावली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस समर्थित गटांना आतून मदत केल्याने हे शक्य झाले आहे. एक ग्रामपंचायत शिवसेना समर्थित छत्रपती शिवाजी आघाडीकडे, तर एक ग्रामपंचायत भाजप समर्थित गटाकडे गेली आहे. रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन सर्कल काॅंग्रेसकडे असून, भाजप व शिवसेनेकडे प्रत्येकी एक सर्कल आहे. येथे पंचायत समितीने पाच सर्कल काॅंग्रेसकडे असून, चार सर्कल शिवसेना व एक सर्कल भाजपकडे आहे.

अनेक वर्षांपासून शिवसेना समर्थित गटाकडे असलेल्या पंचाळा (बु) येथील मतदारांनी यावेळी शिवसेना समर्थित गटाला धक्का दिला आहे. येथे एकूण ११ पैकी सात जागांवर काॅंग्रेस समर्थित गटाने बाजी मारली असून, शिवसेना समर्थित गटाला एकमेव, तर भाजप समर्थित गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. किरणापूर येथील नऊपैकी सहा जागा काॅंग्रेस समर्थित गटाच्या वाट्याला गेल्या असून, तीन जागांवर शिवसेना समर्थित गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

चिचाळा येथे ११ पैकी काॅंग्रेस समर्थित युवा ग्रामीण विकास आघाडीने १०, तर शिवसेना समर्थित गटाने एक जागा जिंकली. येथे काॅंग्रेस व भाजप समर्थित गटांची आघाडी हाेती. खुमारी येथे ११ पैकी काॅंग्रेस समर्थित गटाला सात, शिवसेना व भाजप समर्थित गटांना प्रत्येकी दाेन जागा मिळाल्या. शिवनी (भाेंडकी) येथे एकूण नऊ जागांपैकी काॅंग्रेस समर्थित परिवर्तन ग्रामविकास आघाडीला सहा, तर शिवसेना समर्थित आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. येथेही काॅंग्रेस व भाजप समर्थित गटांनी हातमिळवणी केली हाेती. मानापूर येथे शिवसेना समर्थित छत्रपती शिवाजी आघाडीने सहा, तर परिवर्तन आघाडीने तीन जागा जिंकल्या. दाहाेदा येथे मतदारांनी काॅंग्रेस समर्थित गटाच्या झाेळीत नऊ जागा टाकल्या.

...

देवलापारमध्ये भाजपचा सफाया

देवलापार ग्रामपंचायतीवर मागील काही वर्षांपासून भाजप समर्थित गटाची सत्ता हाेती. या निवडणुकीत काॅंग्रेस समर्थित गटाने १३ पैकी ११ जागांवर विजय संपादन केला असून, भाजप समर्थित गटाला केवळ दाेन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर भाजप समर्थित गटाचा सफाया झाला आहे.

...

मनसेने खाते उघडले

पथरई येथे काँग्रेस समर्थित गटाला पराभवाला सामाेरे जावे लागले असून, येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थित गटाने खाते उघडले आहे. येथे काॅंग्रेस समर्थित गटाला दाेन, तर भाजप समर्थित गटाला पाच जागा मिळाल्या आहेत. दाेन जागांवर मनसे समर्थित गटाने विजय संपादन केला आहे.