शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

समाजकंटकांच्या विरोधात आवाज उठवा

By admin | Updated: November 22, 2015 03:09 IST

शास्त्राचे केवळ वाचन करणे पुरेसे नाही तर ते आचारणात आणावे लागेल. श्रीकृष्णाच्या भगवतगीतेमध्येदेखील कर्मयोगाबरोबरच आपल्या हक्कासाठी, ...

विश्वास कुळकर्णी महाराज : कीर्तन महोत्सवनागपूर : शास्त्राचे केवळ वाचन करणे पुरेसे नाही तर ते आचारणात आणावे लागेल. श्रीकृष्णाच्या भगवतगीतेमध्येदेखील कर्मयोगाबरोबरच आपल्या हक्कासाठी, विजयासाठी लढण्याची शिकवण दिली आहे. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टींची समाजाला आवश्यकता आहे. आपल्या देवतांनी देखील दुर्जनांचा सामना करण्यासाठी शस्त्र हाती घेतले होते. त्यामुळे आपणही समाज कंटकांच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठविण्याची गरज आहे, असे मत कीर्तनकार विश्वास कुळकर्णी महाराज यांनी व्यक्त केले.संवेदना परिवार संस्था व पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात आयोजित कीर्तन महोत्सवात दुसरे पुष्प पुणे येथील विश्वास कुळकर्णी महाराज यांनी गुंफले. या वेळी कुळकर्णी महाराज म्हणाले, ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याची गरज ओळखून ३८ व्या स्वातंत्र्य संमेलनाचे अध्यक्ष असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा आणि शस्त्र हाती घ्या’ असे म्हटले होते. तर, मानवाने कसे जगावे याची नियमावली म्हणजे शास्त्र होय. मात्र, शस्त्र हाती घेण्याची शिकवण जर दिल्या जात नसेल तर ते शस्त्र काय कामाचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संतांची बाह्य व आंतर लक्षणे उलगडून सांगत असतानाच त्यांनी देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या चाफेकर बंधू यांची शौर्यगाथा विषद केली. वासुदेव बळवंत फडके यांनी मातृभूमीसाठी दिलेल्या बलिदानाच्या बातमीने प्रेरित होऊन चाफेकर बंधू यांनी देश सेवेचा ध्यास घेतला. टिळकांसोबत मिळून पुढे गणेशोत्सव व शिवजयंती महोत्सव सुरू केला. देशप्रेमापोटी चाफेकर बंधू फासावर चढले, असेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांच्या देशसेवेचा गौरव करावा, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, आ. डॉ. मिलिंद माने, संजय भेंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)