शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

राशन माफियांकडे छापे, वितरण अधिकाऱ्यांची संशयास्पद तटस्थता

By नरेश डोंगरे | Updated: November 20, 2025 23:07 IST

शालेय पोषण आहाराचे पॅकेट अन् एकात्मिकचे कट्टे : अधिकारी म्हणतात, धान्य आमचे नव्हेच  

- नरेश डोंगरे 

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील सरकारी धान्य वितरण प्रणालीतील काळाबाजार सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. त्याची तक्रार मंत्रालयापर्यंत झाली असली तरी येथील अधिकारी मात्र राशन माफियांवरील कारवाईच्या संबंधाने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत. चार दिवसांत धान्याच्या 'अवैध' गोदामांवर  दोन वेळा छापे पडल्याने हा विषय पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, 'लोकमत'ने १५ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत 'अन्न पुरवठा विभागात सुरू असलेल्या घोळाचा पर्दाफाश' करणारी मालिक प्रकाशित केली होती. यात भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगणमत करून राशन माफिया 'गरिबांच्या हक्काचे अन्न ओरबडून खात असल्याचा वृत्तांत मांडला होता. गरिबांसाठी असलेला तांदूळ कंची मारून बाजारात विकला जातो, महिन्याला १३०० पोती धान्य पद्धतशिर गायब केले जाते आणि अधिकारी मात्र मुग गिळून बसल्याचेही स्पष्ट केले होते. या वृत्त मालिकेची जिल्हाधिकाऱ्यांसह अन्न पुरवठा मंत्रालयानेही दखल घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतल्यानंतर येथील एफडीओ आणि डीएसओने या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन कारवाई करण्याचे जाहिर केले होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. याऊलट राशन माफिया पुन्हा सक्रिय झाले. यापैकी विक्की कंगवाने, सोनू ठाण, रितेश, नासरे, केसरवाने आदींनी आपल्या गोदामात मोठ्या प्रमाणात धान्याचा अवैध साठा जमा केल्याची माहिती चर्चेला आली होती. 'लोकमत'च्या वृत्तानंतर शहरातील एका मोठ्या नेत्याकडून त्याची तक्रार झाल्यानंतर सोमवार ते बुधवार दरम्यान पोलिसांनी जरीपटका, टेकानाका आणि यशोधरानगर भागात गोदामांवर छापे घातले. या छाप्यात शालेय पोषण आहाराचे पॅकेट आणि एकात्मकचे कट्टे आढळले. त्यामुळे अन्न वितरण पुरवठा अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. तेथे डीएसओ पडोळे आणि प्रभारी एफडीओ काळे पोहचले. मात्र, त्यांनी हे धान्य आमच्या विभागाचे नाही', असे म्हटले. हे वृत्त जिल्हा पुरवठा यंत्रणेत चर्चेला आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.माफियांचे 'आका'ना 'फोनो फ्रेण्ड'सूत्रांच्या माहितीनुसार, कारवाईत खिचडी आणि राशनचा २० टनांपेक्षा जास्त तांदुळ सापडला आहे. या कारवाईनंतर राशन माफियांकडून आपल्या 'आका'कडे 'फोनो फ्रेण्ड' करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, या संबंधाने एफडीओ विनोद काळे यांच्याकडे संपर्क केला असता, मंगळवारी आपण कारवाईच्या ठिकाणी गेलो होतो. गोंदियातून माल घेत असल्याने छाप्यात आढळलेला माल आपला नसल्याचे आपण पोलिसांना सांगितले. मंगळवार, बुधवारच्या छाप्याची कारवाई करणाऱ्या पोलिसांकडून आपल्याला पत्र आल्यानंतर आपण कारवाई करू, अशी माहितीवजा प्रतिक्रिया काळे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Raids on Ration Mafia, Distribution Officers' Suspicious Neutrality Questioned.

Web Summary : Ration mafia raids expose black market in Nagpur's food distribution. Officials' inaction raises concerns. 'Lokmat' exposé revealed corruption, but no action followed. Recent raids uncovered illegal grain stockpiles, with officials disclaiming ownership, fueling controversy and suspicion of collusion.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी