शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सुटणार

By admin | Updated: August 20, 2016 02:40 IST

साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील काही गावांमध्ये कृषी व गावठाणात १२ तास वीज देण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करावा,

१२ तास वीज देण्याचा प्रस्ताव द्या : ऊर्जामंत्री बावनकुळे यांची सूचना नागपूर : साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यातील काही गावांमध्ये कृषी व गावठाणात १२ तास वीज देण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. यामुळे या परिसरातील २० हजार शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे. रविभवन येथे वीजभार नियमनाच्या समस्येबाबत साकोलीचे आमदार बाळा काशीकर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले व २० हजार शेतकऱ्यांची समस्या सांगितली. भारनियमन कमी करण्यासाठी ५२ फिडर बसवावे लागतील, असे यावेळी सांगण्यात आले. गावठाण व कृषीपंपांना १२ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येणे शक्य आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असेही बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर देशमुख, नगरसेवक संदीप जोशी, रमेश सिंगारे, संदीप जाधव यांनी नागरिकांच्या समस्या पालकमंत्र्यांना सांगितल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शुक्रवार रविभवनमध्ये विविध समस्या सांगण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक भेटले. प्रभाग क्रमांक २४ येथील वायुसेना नगर अंतर्गत असलेल्या हजारीपहाड ते भिवसेन खोरीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आमदार सुधाकर देशमुख यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. या संदर्भात रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आॅक्टोबर महिन्यातील एक दिवस निश्चित करावा. पोलीस संरक्षण घेऊन अतिक्रमण हटताच रस्त्याच्या रुंदीकरण कामास सुरुवात करावी, अशी सूचना केली. वांझरा वस्तीतील एसआरए अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या सहनिवासमध्ये पाणी, वीज, व इतर सुविधा तातडीने पुरवाव्या, असे निर्देश महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी नगरसेवक संदीप जोशी उपस्थित होते. निडमहॅम पार्कमधील महानगर पालिकेची जागा संस्थेला देणे, ग्रामपंचायत डेगमा (बुद्रुक) येथे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या देवजीबुआ देवस्थानाच्या बांधकामासाठी वन विभागाची जागा मिळणे, मानेवाडा बेसा रोडवरील रहिवासी नागरिकांच्या समस्या, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून अपंग कोट्यातून शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत नागरिकांनी आपली निवेदने सादर केली. (प्रतिनिधी)