शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णांनी फुलवला भाज्यांचा मळा, 5 एकरवर केली शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 05:42 IST

नागपूरमधील आशादायी चित्र : पाच एकरवर केली जाते शेती

सुमेध वाघमारे नागपूर : बहुतेक मनोरुग्ण गरीब, शेतकरी कुटुंबातील. त्यांना जनावरे, माती-शेतीशी जोडले तर ते लवकर बरे होतात. हा अनुभव लक्षात घेऊन याच अनुभवावर मागील काही वर्षांपासून त्यांच्या परिश्रमावर जवळपास पाच एकरवर केळी व भाज्यांचा मळा फुलला. एकदा रुग्ण मनोरुग्णालयात दाखल झाले की, अखेरच्या श्वासापर्यंत त्याचे आयुष्य दगडी भिंतींआड जाते, असे बोलले जाते. परंतु, नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील चित्र वेगळे आहे. मनोरुग्णालयातील विविध सामाजिक उपक्रमांतून मनोरुग्णांना समाजाशी जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयातील ४० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. यातील काही बरे झालेल्या व शेतीकामाची आवड असणाऱ्यांना हाताशी धरून त्यांना शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. मनोरुग्णालयातील सुमारे दोन एकरमध्ये भाजीपाला तर टाटा ट्रस्टच्या ‘उडाण’ या उपक्रमातून तीन एकरमध्ये केळीची बाग लावण्यात आली आहे.  

नागपूरमधील आशादायी चित्र : पाच एकरवर केली जाते शेतीगेल्या तीन वर्षांत २९ हजार १७८ किलो विविध भाज्या व केळीचे उत्पादन घेतले आहे. सध्या दोन वेळच्या जेवणासाठी लागणारी भाजी याच शेतीतून येते. उरलेला भाजीपाला व फळेविक्रीसाठी पाठवून त्यातील मिळालेला पैसा रुग्णांच्या खात्यात जमा केला जात आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरला आहे. २०१८ मध्ये २७ रुग्णांनी मिळून मेथी, पालक, मुळा, गोडबाजी, टोमॅटो आणि पपई असे एकूण १४६५ किलोचे उत्पादन घेतले. २०१९ मध्ये ५३ मनोरुग्णांच्या प्रयत्नांतून ७३६ किलो तर २०२० मध्ये ३५ मनोरुग्णांच्या कष्टावर २६ हजार ९७७ किलोच्या केळीचे उत्पादन घेण्यात आले. या तीन वर्षांत ११५ मनोरुग्णांच्या परिश्रमातून २९ हजार १७८ किलो केळी व भाज्यांचे उत्पादन काढण्यात यश मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर