शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

४९ प्रस्तावांना महिनाभरात मान्यता द्या

By admin | Updated: April 6, 2017 02:28 IST

जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे ४९ प्रस्ताव महिनाभरात शासनाकडे सादर करून मान्यता घेऊन, निविदा प्रक्रिया पूर्ण

पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांचे जि.प.ला निर्देश : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची बैठक नागपूर : जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे ४९ प्रस्ताव महिनाभरात शासनाकडे सादर करून मान्यता घेऊन, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नागपूर जिल्हा परिषदेला दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक मुंबईच्या मंत्रालयात पार पडली. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा या प्रसंगी घेण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांच्या ४९ प्रस्तावांपैकी २५ प्रस्ताव नागपूर जि.प.ने नुकतेच शासनाकडे सादर केले. असे असले तरी सर्व प्रस्ताव महिनाभरात शासनाकडून मंजूर करवून घेण्याचे निर्देश याच बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जि.प.च्या सीईओ कादंबरी भगत यांना दिले. बैठकीला आमदार समीर मेघे, प्रकाश गजभिये, मल्लिकार्जून रेड्डी, सुधाकर देशमुख, अनिल सोले, कृष्णा खोपडे,नागो गाणार,गिरीश व्यास, पाणीपुरवठा विभागाचे सचिव राजेशकुमार, म.जि.प्रा.चे लांडगे व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांपैकी ५ कोटी खर्चापेक्षा जास्त रकमेच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असून अशा १० पैकी ४ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे अजून पाठवायचे आहेत. ते महिनाभरात शासनाला पाठवावे, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री यांनी संयुक्तपणे दिले. समीर मेघे यांनी टाकळघाट, नीलडोह, डिगडोह, बुटीबोरी येथील पाणीपुरवठा योजनांच्या समस्या दूर करुन योजना लवकर सुरू करण्याची सूचना केली. कोंढाळीची योजना ८ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या योजनेवरील खर्च वाढला आहे. ३.५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करुन ही योजना लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. पारशिवनी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. पण ग्रामपंचायतीने योजना हस्तांतरित न करून घेतल्याने व या योजनेवर निधी उपलब्ध नसल्यामुळे पाणीपुरवठा थांबवण्यात आला. ५.५ कि.मी.ची नवीन पाईप लाईन टाकण्याची गरज आहे. रामटेक पाणी पुरवठा योजनेमध्ये गळतीचे प्रमाण अधिक आहे. बऱ्याच ठिकाणी पाईप फुटली आहे. नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज असून त्यासाठी लागणाऱ्या ३.५ ते ४ कोटीची मागणी रेड्डी यांनी केली.(प्रतिनिधी) महापालिकेच्या २४ बाय ७ योजनेचा घेणार आढावा नागपूर पेरीअर्बन पाणी पुरवठा योजनेची कामे १० गावांमध्ये सुरु झाली असून ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या महिना अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. बिडगाव-तरोडी योजना १२.५ कोटीची आहे. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत भिलगाव, लावा-सुराबर्डी, बोखारा या तीन पाणीपुरवठा योजना जलस्वराज्य-२ अंतर्गत घेण्यात येणार आहे. पेरी अर्बनच्या सर्व गावातील योजना १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच कामठी शहराचे पाणीपुरवठ्यासाठी तीन झोन तयार करण्यात येणार आहे. याचवेळी नागपूर शहराच्या पाणीटंचाई व २४ बाय ७ योजनांचा आढावा घेण्यासाठी १० तारखेला नागपुरात बैठक घेण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. अल्पमुदती निविदा काढा पाणी टंचाईच्या योजनांच्या कामांसाठी जि.प. व म.जि.प्रा. ने अल्प मुदती निविदा काढण्यास पाणीपुरवठा विभागाने मान्यता दिल्याचे सचिव राजेश कुमार यांनी बैठकीत सांगितले. यापूर्वीच ही मान्यता दिली होती. लवकरच जि.प. व म.जि.प्रा.ला लेखी पत्र पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.