शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील मराठी बोलीचे संवर्धन व्हावे

By admin | Updated: January 15, 2016 03:36 IST

विदर्भ राज्य होणे ही राजकीय गरज आहे. परंतु यातून मराठी माणसांचे सांस्कृतिक तुकडे होत आहेत व विदर्भवाद हा अमराठीवाद...

श्रीहरी अणे : विदर्भ साहित्य संघाचा ९३ वा वर्धापनदिन साजरानागपूर : विदर्भ राज्य होणे ही राजकीय गरज आहे. परंतु यातून मराठी माणसांचे सांस्कृतिक तुकडे होत आहेत व विदर्भवाद हा अमराठीवाद असल्याचा गैरसमज पसरविण्यात येत आहे. मूळात विदर्भवादी हे मराठी माणसाविरुद्ध नाहीत. मराठीला समृद्ध करण्यात विदर्भाचादेखील वाटा आहे. येथील प्रादेशिक साहित्याला दुय्यम दर्जा देता येणार नाही. विदर्भातील मराठी बोलीचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाचा ९३ वा वर्धापनदिन आणि वाड्.मय पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम, कार्याध्यक्ष वामन तेलंग, चंद्रपूर येथे होणाऱ्या विदर्भ साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे सचिव सदानंद फुलझेले, शांतारामजी पोटदुखे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. सदानंद देशमुख व सदानंद फुलझेले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.मराठी भाषेची मक्तेदारी ही केवळ मुंबई किंवा पुण्यापुरती मर्यादित नाही. असे असताना मराठी भाषेची प्रगल्भता ही केवळ एकाच प्रदेशापुरती मर्यादित आहे असा समज का आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुंबई, पुण्याच्या साहित्यिकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. महाराष्ट्राच्या अगोदरपासून विदर्भात मराठीचा वारसा आहे. मराठी भाषेला विदर्भाने अनेक पैलू दिले. विदर्भातील बोलीला मान येथील नागरिकांनीच द्यायला हवा व तिचा अभिमान बाळगायला हवा, असे अ‍ॅड.अणे म्हणाले. साहित्य आणि कायदा यांचा तसा पाहिला तर संबंध आहे. मराठी भाषेत काळानुरूप अनेक बदल झाले. या भाषेला आणखी वैभवशाली करण्यासाठी स्थानिक भाषाशास्त्राचा यात समावेश करावाच लागेल, अन्यथा भाषा संकुचित होईल. असे प्रतिपादन अणे यांनी केले. कार्यक्रमात ‘निवडक युगवाणी-भाग २’ या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रकाश एदलाबादकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शुभदा फडणवीस यांनी संचालन केले तर विलास देशपांडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी) विदर्भातील साहित्याला अवकळायावेळी साहित्य संघाच्या वार्षिक वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सदानंद फुलझेले व डॉ.सदानंद देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना वि.सा.संघाच्या कार्याचे कौतुक केले. डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी मी पार पाडतो आहे, असे फुलझेले म्हणाले. तर विदर्भातील शेतीप्रमाणेच येथील साहित्याला देखील अवकळा आली आहे, असे धाडसी विधान डॉ. देशमुख यांनी केले.

‘लोकमत’चे राजेश पाणूरकर यांना पुरस्कारयावेळी साहित्यक्षेत्राशी संबंधित सारस्वतांचा व नवलेखकांचा सत्कार वाङ्मय पुरस्कारांनी सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’चे उपसंपादक राजेश पाणूरकर यांचा हरिकिशन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याशिवाय ई.झेड.खोब्रागडे, भाऊ गावंडे, डॉ.राजेंद्र डोळके, उर्मिला निनावे, एकनाथ तट्टे, डॉ. मनोहर नरांजे, बळवंत लामकाणे, मालविका देखणे, केशव मुळे, गणेश भाकरे, ओंकार नंदनवार यांचादेखील विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट शाखा पुरस्काराची मानकरी लाखनी शाखा ठरली.