शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज काढून देण्याची बतावणी

By admin | Updated: June 3, 2017 01:55 IST

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १० महिलांकडून प्रत्येकी २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक

दोन लाख रुपये हडपले : १० महिलांना गंडा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १० महिलांकडून प्रत्येकी २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किरण आशिष मेश्राम (रा. न्यू बिडीपेठ, सक्करदरा) आणि नेहा ऊर्फ जेनब साहिल खान (वय ३७, रा. एमजी कॉलनी नंदनवन) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी महिलांचे सदरमधील उत्कर्ष निर्माण मंगळवारी बाजार येथे कार्यालय होते. विविध भागातील महिलांच्या भेटी घेऊन आरोपी किरण आणि नेहा त्यांना नाबार्डकडून कर्ज मिळवून देण्याची बतावणी करीत होत्या. तत्पूर्वी कागदपत्रे तयार करण्यासाठी आणि अन्य बाबींसाठी खर्च येतो, असे सांगून त्या कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात अनेक महिला किरण आणि नेहाच्या हातात हजारोंची रक्कम ठेवत होत्या. सुमन गुलाबचंद राहांगडाले (वय ४५, रा. इसासनी, हिंगणा) आणि त्यांच्या सोबतच्या नऊ महिलांनी अशाच प्रकारे लाखोंचे कर्ज मिळते म्हणून आरोपी किरण आणि नेहाला प्रत्येकी २० हजार रुपये दिले. ही रक्कम घेतल्यानंतर १ जून २०१६ ते १ जून २०१७ पर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून आरोपी किरण आणि नेहा पैसे देणाऱ्या महिलांना टाळत होत्या. त्या कर्ज मिळवून देऊ शकत नाही, हे ध्यानात आल्यामुळे राहांगडाले आणि अन्य महिलांनी आपली रक्कम परत मागितली असता आरोपी महिलांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे राहांगडाले आणि अन्य नऊ महिलांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी किरण आणि नेहाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे. अनेकींना गंडा या दोघींनी केवळ १० महिलांना नव्हे तर अशाच प्रकारे विविध भागातील अनेक महिलांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्यानुषंगानेही या प्रकरणाचा तपास करीत आहेत.