शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

भिवापूर, कुहीत काँग्रेसचे नगराध्यक्ष

By admin | Updated: November 28, 2015 03:28 IST

जिल्ह्यातील तीन नगर पंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली.

नागपूर : जिल्ह्यातील तीन नगर पंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. त्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेसने दोन ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका नगर पंचायत अध्यक्षपदी आपल्या पक्षाच्या सदस्याची वर्णी लावली. दुसरीकडे शिवसेनेने ऐनवेळी काँग्रेसला ‘हात’ दिल्याने भाजपची कोंडी झाली. ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी ही मोठी धक्का मानला जात आहे.भाजपला शिवसेनेचा ‘दे धक्का’कुही, भिवापूर आणि हिंगणा नगर पंचायत निवडणुकीत ५१ पैकी सर्वाधिक १४ जागांवर भाजपने विजय मिळविलेला असला तरी कोणत्याच नगर पंचायतमध्ये बहुमत मिळविता आले नाही. कुहीत पाच, भिवापूरमध्ये तीन तर हिंगण्यात सहा जागा प्राप्त केल्या. कुहीत बहुमतासाठी काँग्रेसला एका सदस्याची आवश्यकता होती तर भिवापूरमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या दोन नगर पंचायतमध्ये भाजपने जोर लावला असता तर सत्ता प्राप्त करता आली असती. मात्र स्थानिक नेत्यांमध्ये असलेला दुरावा, मतभेद यामुळे ते करता आले नाही. त्यातल्या त्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने ऐनवेळी भाजपची साथ सोडून काँग्रेसला ‘हात’ दिला. भिवापुरात भाजप, शिवसेना आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता प्राप्त करता आली असती. मात्र त्यासाठी नेते उदासीन असल्याने काहीच होऊ शकले नाही. तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आ. राजेंद्र मुळक यांनी यशस्वी खेळी खेळत कुही आणि भिवापूर नगर पंचायतचे अध्यक्षपद आपल्या पक्षाच्या सदस्याला मिळवून देण्यात यश मिळविले. भिवापुरात काँग्रेस-शिवसेनेची युतीतीन नगर पंचायतींपैकी सर्वाधिक रंगतदार चित्र भिवापूर येथे निर्माण झाले होते. तेथे सर्वाधिक पाच जागांवर काँग्रेसने विजय मिळविला असला तरी बहुमतासाठी जुळवाजुळव करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागली. शिवसेनेचे चार, भाजप आणि बसपाचे प्रत्येकी तीन तर अपक्ष दोन याप्रमाणे तेथे उमेदवार निवडून आले. कोणत्याच पक्षाकडे बहुमत नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. त्यात काँग्रेसकडून आ. राजेंद्र मुळक यांनी डावपेच आखून शिवसेनेला जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी होऊन ऐन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेससोबत ‘हात’मिळवणी केली. त्यामुळे काँग्रेसचे पाच आणि शिवसेनेचे चार असे एकूण नऊ संख्याबळ त्यांच्याकडे होऊन बहुमताचा आकडा पार करण्यात काँग्रेसला यश मिळाले. त्या बळावर भिवापुरात काँग्रेसने नगराध्यक्षपदी आपल्या पक्षाचा उमेदवार बसविला तर उपाध्यक्षपद हे शिवसेनेला देण्यात आले.