शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मातृसेवा संघ रुग्णालयाचा गर्भवती महिलांना घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 18:16 IST

गर्भवती महिलांच्या कुशल प्रसुतीसाठी नागपुरात मातृसेवा संघ सुतिकागृह हे विख्यात आहे आणि समाजातल्या अतिसामान्य कुटूंबांना येथून समाधान मिळत गेले आहे. मात्र, वर्तमानातील संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या हृदयात आस्थेचे स्थान असलेल्या सुतिकागृहाने गर्भवती महिलांना स्विकारण्याची टाळाटाळ सुरू केली असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देसोनोग्राफी आणि इतर टेस्टसाठी पाठविले जातेय खाजगी इस्पितळांकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गर्भवती महिलांच्या कुशल प्रसुतीसाठी नागपुरात मातृसेवा संघ सुतिकागृह हे विख्यात आहे आणि समाजातल्या अतिसामान्य कुटूंबांना येथून समाधान मिळत गेले आहे. मात्र, वर्तमानातील संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या हृदयात आस्थेचे स्थान असलेल्या सुतिकागृहाने गर्भवती महिलांना स्विकारण्याची टाळाटाळ सुरू केली असल्याचे स्पष्ट होत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र पसरत आहे. नागपुरातही दिवसेंदिवस बाधा झालेले रुग्ण मेडिकल, मेयोमध्ये दाखल होत आहेत. अनेक संशयितांवर आयसोलेशन व क्वॉरंटाईनची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सरकारने अनेक खाजगी रुग्णालयांना ताब्यातही घेतले आहे. अशा स्थितीत अनेक गर्भवती महिलांना खाजगी रुग्णालयांनी मेडिकल, मेयो, डागा हॉस्पिटल, सुतिकागृह व अन्य निम्न शासकीय रुग्णालयांकडे जाण्याचा आग्रह धरला आहे. कोरोना विषाणूचा धसका म्हणून आणि खाजगी इस्पितळांकडे कोरोनाच्या उपचाराची परवानगी नसल्यामुळे गर्भवती महिलेस कुठलीही बाधा होण्यापूर्वी किंवा तशी साधारण लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार केलेजावे म्हणून हा आग्रह आहे. अशा स्थितीत मातृसेवा संघांच्या सुतिकागृहांना गर्भवती महिला प्राधान्य देत आहेत. मेडिकल, मेयो, डागा रुग्णालयात आधीच अशा महिलांची तुंबड गर्दी असल्याने पर्याय म्हणून सुतिकागृहांना पसंती दिली जात आहे. मात्र, सुतिकागृहात गर्भवती महिलांची नवी नोंदणी व तपासणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांस विचारले असतान व्यवस्थापनाचा तसा आदेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, अशा महिलांना या प्रसुतीच्या वेदना अत्यंत वेदनादायी ठरत आहेत. अशा गर्भवती महिलांनी जावे कुठे, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. यासोबतच आधीपासूनच उपचार घेत असलेल्या महिलांना सोनोग्राफी व इतर टेस्ट करिता खाजगी रुग्णालयांचे पत्ते दिले जात आहे. सुतिकागृहामध्ये प्रसुतीसंदर्भातल्या सर्वच अद्ययावत सुविधा असताना, येथील डॉक्टरांकडून रुग्णांना खाजगींकडे पाठविले जाणे, अनेक प्रश्नांना मार्ग मोकळे करणारे ठरत आहे.नऊ महिन्याच्या गर्भवतीला खोकला आहे म्हणून परत पाठविलेबुधवारी कुही येथून नियमित तपासणीसाठी येणाºया सपना दशमवार यांना महाल येथील सुतिकागृहाकडून खोकला होता म्हणून त्यांना प्रवेशद्वारातूनच परत पाठविण्यात आले. त्यांना गर्भधारणेचा नववा महिना लागून १५ दिवस उलटले आहेत. अशा स्थितीत त्या कधीही प्रसुत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नियमित तपासणीसाठी आले असता केवळ खोकला आहे म्हणून त्यांना परत पाठविण्याचा विचित्रपणा यावेळी केला गेला. अखेर प्रकरण अंगलट येण्याची शक्यता दिसताच डॉक्टरांनी तात्काळ त्यांना तपासणीसाठी बोलावले. अन्यथा, अशा काळात त्यांना नवे रुग्णालय शोधण्याची वेळ आली होती. खोकला किंवा अन्य लक्षणे दिसतात तर मातृसेवा संघात तेथेच त्याची तात्काळ तपासणी करण्याची यंत्रणा ठेवणे अशा काळात गरजेचे आहे. मात्र, त्याउलट रुग्णांना नाकारणे, हा प्रसुती वेदना असलेल्या महिलेवर अन्याय असल्याची भावना सपना यांचे पती प्रशांत दशमवार यांनी व्यक्त केली.मेयो, मेडिकल, डागा रुग्णालयावर येईल प्रचंड भारकोरानाचे संकट अत्यंत भयावह आहे. लॉकडाऊन, संचारबंदी आणि नाकाबंदीमुळे व्यक्ती कुठेच जाऊ शकत नाही. अनेक गर्भवती महिला बाळंतपणासाठी आपल्या माहेरी जाण्याची तयारी करत असतानाच हे संकट उद्भवले आहे. त्यामुळे, नागपुरातच प्रसुती करण्याची वेळ आली आहे. खाजगी रुग्णालये यावेळी प्रसुतीची प्रकरणे हाताळण्यास टाळाटाळ करत आहेत. अशावेळी त्यांना सुतिकागृहे, मेडिकल, मेयो व डागा या रुग्णालयांचेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, प्रसुतीच्या क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठित असलेल्या सुतिकागृहांसारख्या रुग्णालयांनी आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरविल्यावर मेडिकल, मेयो या रुग्णालयांवर अधिक ताण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस