शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मारहाणीने गर्भवतीची आत्महत्या

By admin | Updated: June 15, 2014 00:34 IST

विवाहित महिलेसोबत एका युवकाचे प्रेमसंबंध जुळले. ती महिला गर्भवती राहिली. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रियकराने तिला मारहाण केली. यामुळे व्यथित झालेल्या विवाहित महिलेने अंगावर रॉकेल ओतून

वरोरा येथील घटना: प्रियकर गजाआड
वरोरा: विवाहित महिलेसोबत एका युवकाचे प्रेमसंबंध जुळले. ती महिला गर्भवती राहिली. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रियकराने तिला मारहाण केली. यामुळे व्यथित झालेल्या विवाहित महिलेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत महिला तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांनी प्रियकरास अटक केली आहे.
मृत महिलेचे नाव सुमित्रा भोजराज कोहाड (३४) रा. मालवीय वार्ड वरोरा आहे. सुमित्राचा विवाह १२ वर्षांपूर्वी नागपूर येथील युवकाशी झाला. विवाहाच्या दोन महिन्यानंतर सुमित्राचा पती अचानक निघून गेला. तिला एक मुलगा आहे. पती सोडून गेल्याने सुमित्रा आपल्या मुलासह वरोरा येथील आपल्या माहेरी राहावयास आली. त्यानंतर ती एका हॉटेलमध्ये कामावर जात होती. त्यावेळी राहुल बापुराव घुडे (२२) रा. बोर्डा ता. वरोरा हा युवकही तेथेच काम करीत होता. एकाच हॉटेलमध्ये असल्यामुळे दोघांंची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. १३ जून रोजी राहुल सुमित्राच्या घरी आला. दोघात कडाक्याचे भांंडण झाले. त्यात राहुलने सुमित्राला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राहुल निघून गेल्यानंतर सुमित्राने अंगावर रॉकेल घेऊन घरातच जाळून घेतले. सुमित्राला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. सुमित्रा तीन महिन्यांची गर्र्भवती होती. सुमित्राच्या आत्महत्येस जबाबदार असल्याने राहुल घुडेविरुध्द कलम ३०६, ४५१, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. मृत महिलेच्या गर्भाची तपासणी करण्याकरिता तसेच आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी करण्याकरिता नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मल्लिकार्जून इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गाढे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)