शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे

By Admin | Updated: April 15, 2016 02:57 IST2016-04-15T02:57:28+5:302016-04-15T02:57:28+5:30

शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या आॅटोचालकाच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. भीमराव गजभिये (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो अंबाझरीत राहतो.

Pornographic toys with a school girl | शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे

शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे

आॅटोचालक गजाआड : सीताबर्डीतील घटना
नागपूर : शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या आॅटोचालकाच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. भीमराव गजभिये (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो अंबाझरीत राहतो. पीडित मुलगी १२ वर्षांची आहे. ती सीताबर्डीतील शाळेत शिकते. ती आतापावेतो सायकलने शाळेत येणे-जाणे करायची. मात्र, ऊन वाढल्यामुळे आणि परीक्षा सुरू झाल्यामुळे पालकांनी तिला शाळेसाठी काही दिवसांपूर्वीच गजभियेचा आॅटो लावून दिला. त्यानुसार, ती आॅटोने जात-येत होती. बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ती गजभियेच्या आॅटोत बसून शाळेत येत होती. आरोपीने धरमपेठमधील एका बोळीत आॅटो थांबवला आणि मुलीशी अश्लील चाळे करू लागला. मुलीने आरडाओरड करीत आॅटोतून पळ काढला. ती शाळेत आली. पेपर सोडविल्यानंतर ती मैत्रिणीसोबत घरी गेली आणि तिने आपल्या आईला सकाळी घडलेला प्रकार सांगितला. आईने आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. सीताबर्डी पोलिसांनी आरोपी गजभियेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून गुरुवारी त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नागरे पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

प्रेयसीवर बलात्कार
गर्भवती प्रेयसीला वाऱ्यावर सोडू पाहणाऱ्या आरोपीवर जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. नावेद मिसबाउद्दीन तलिफ असे आरोपीचे नाव आहे. तो चॉक्स कॉलनी जरीपटका येथे राहतो. आरोपी नावेदने ३४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. चार वर्षांपासून तो तिला पत्नीसारखा वापरू लागला. ती गर्भवती झाली असता त्याने तिचा गर्भपात करवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित महिलेने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी नावेदविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Pornographic toys with a school girl