शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीवरील चुन्याच्या रंगकामाने केली ‘पोलखोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : घरी कार्यक्रम नाही. सण, उत्सवसुद्धा नाहीच. अशावेळी घरातील भिंतीला चुना का मारला. ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : घरी कार्यक्रम नाही. सण, उत्सवसुद्धा नाहीच. अशावेळी घरातील भिंतीला चुना का मारला. रंगकाम करण्याचे कारण तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. परिसरात कुजबुज सुरू झाली. मला ‘त्या’दिवशी आवाज आला होता, असे आणखी एक गूढ समोर आले. याच चर्चेच्या बाबींवर उमरेडच्या रेल्वे झोपडपट्टीतील नागरिकांनी बोट ठेवले. ४-५ तास चर्चा गरम झाली. संशयितांना ठाण्यात आणले गेले. रक्ताने माखलेल्या भिंतीवर चुना मारण्याचा प्रकारही उघड्यावर आला. चुना मारलेली भिंत अखेर बोलू लागली. खून झाल्याचा पर्दाफाश झाला.

रविवारी, ५ सप्टेंबर रोजी पैशाच्या क्षुल्लक कारणावरून ग्याना रुपराव शेंडे (वय २३, रा. रेल्वे झोपडपट्टी, उमरेड) याला डाेक्यावर काठीने प्रहार करून जीवानिशी ठार केले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पोत्यात मृतदेह टाकून सायकलवर मांडून निर्जनस्थळी दफन करीत विल्हेवाट लावण्यात आली. उमरेड रेल्वे झोपडपट्टी परिसरात झालेल्या या रहस्यमय घडामोडीनंतर या प्रकरणी नागरिकांची सतर्कता दिसून आली. दुसरीकडे उमरेड पोलिसांचा चालढकलपणासुद्धा चव्हाट्यावर आला.

सुरजित ऊर्फ गोलू सखाराम मांडले (वय ३०) आणि विजेन ऊर्फ विजय ऊर्फ सुकळू धनराज करतुले (२२, रा. झोपडपट्टी, उमरेड) यांना अटक झाली. तिघे मित्र होते. लोभापायी मित्रांनीच मित्राचा काटा काढला. परिसरात दहशतीचे वातावरण असून, असामाजिक तत्त्वांचे वाढलेले ‘साम्राज्य’ चिंतेचा विषय ठरत आहे.

५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपासून मृत ग्यानी शेंडे हा घरी नव्हता. सायंकाळ झाली. घरी सर्वजण जेवण करीत होते. दरम्यान, ग्यानी अद्याप का आला नाही, असे विचारचक्र सुरू झाले. सर्वत्र अंधार पसरला होता. पावसाच्या सरीही सुरू होत्या. सर्वत्र विचारणा सुरू झाली. रात्र अधिक गडद होत असतानाही ग्यानी घरी परतला नाही. अशातच झोपडपट्टीमधील अनेकांनी परिसर पिंजून काढला. ग्यानी गवसला नाही. सर्वांचाच हिरमोड झाला.

अखेर दुसऱ्या दिवशी सोमवारी ६ सप्टेंबरला ग्यानी शेंडे हरविल्याची तक्रार देण्यात आली. फारशी चौकशी होत नसल्याचे ध्यानात येताच नागरिकांनीच पुढाकार घेत या घटेनबाबत खुनाचा संशय व्यक्त केला. रंगकाम केलेली भिंत, संशयितांच्या हालचाली, त्यांचा गुन्हेगारी स्वभाव आदी बाबींकडे लक्ष वेधले गेले. त्यानंतर ‘त्या’ दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला. अखेरीस खून करून मृतदेह पुरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला.

.....

आरोपींची दहशत

उमरेड झोपडपट्टी परिसरात शंभरावर झोपड्या आहेत. बऱ्याच वर्षांपासून असलेल्या या झोपडपट्टीत गुंडशाही फारशी फोफावली नाही. अशातच मागील काही वर्षांपासून गोलू मांडले आणि विजय करतुले यांची चांगलीच दहशत होती. त्यांच्याविरोधात यापूर्वीही तक्रारी झाल्यात, अशी माहिती पुढे येत आहे. काही लोकांचेही पाठबळ त्यांना मिळत असल्याची चर्चा व्यक्त होत आहे.

....

पोत्यातून नेला मृतदेह

एकीकडे मृताची शोधाशोध सुरू होती, तर दुसरीकडे आरोपींनी लगतच्याच स्वत:च्या घरात मृतदेह पोत्यात कोंबला हाेता. घटनेदरम्यान रक्त भिंतीवर उडाल्याने भिंत खराब झाली होती. अशातच अगदी पहाटे मृतदेह सायकलवर ठेवून, सुमारे २ कि.मी. अंतरावर सेवामार्गाकडे नेण्यात आला. यासाठी दोन पोते आणि एका सिमेंटच्या बॅगचाही वापर आरोपींनी केला. केबल वायरसाठी खोदकाम करण्यात आलेल्या खड्डयात पुन्हा खड्डा करीत मृतदेह पुरला गेला.

...

असामाजिक तत्त्वांचा बोलबाला

उमरेड नगरीत मागील वर्षभरापासून असामाजिक तत्त्वांचा बोलबाला दिसून येत आहे. ब्लॅकमेलिंग, खून, चोऱ्या, हाणामारी नेहमीच्याच झाल्या आहेत. विविध प्रकरणांसाठी ‘सेटिंग’बाज नेहमीच सक्रिय, सतर्क असतात, अशीही खुलेआम चर्चा सुरू झाली आहे.

....

१३ पर्यंत पोलीस कोठडी

शनिवारी (दि.११) उमरेडच्या जेएमएफसी न्यायालयात दोन्ही आरोपींना नेण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहेत.