शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
3
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
4
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
5
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
6
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
7
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
8
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
9
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
10
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
11
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
12
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
13
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
14
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
15
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
16
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
17
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
18
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
19
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
20
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारकर्त्यांना मारहाण व शिवीगाळ करणे पोलिसांना भोवणार : नागपूर खंडपीठाचा पोलिसांना खडसावणारा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 15:20 IST

हायकोर्टाचा निर्णय : फौजदारी कारवाई रद्द करण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
तक्रारकर्त्यांना मारहाण व शिवीगाळ करणे पोलिसांच्या कार्यालयीन कर्तव्यांतर्गत मोडत नाही. त्यामुळे अशी कृती करणाऱ्या पोलिसांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून गडचिरोली जिल्ह्यातील दोन पोलिसांना दणका दिला.


प्रकरणावर न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी निर्णय दिला. शशिकांत जरीचंद लोंधे व करुणा कैलाश चुगुले, अशी दणका बसलेल्या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कर्मचाऱ्यांविरुद्ध सूड घेण्याच्या भावनेतून खोटी तक्रार दाखल करण्यात आली, असा दावा पेंढरी पोलिसांनी केला होता व हे प्रकरण बंद करण्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात 'बी-समरी' अहवाल सादर केला होता. ३ जून २०२४ रोजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता तो अहवाल नामंजूर करून आरोपी पोलिसांना नोटीस बजावली. त्यामुळे आरोपी पोलिसांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ती याचिका फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.


आरोपी पोलिसांनी वादग्रस्त कृती कार्यालयीन कर्तव्याचा भाग असल्याचे सांगून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यापूर्वी सीआरपीसी कलम १९७ अनुसार सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे, असा दावा केला होता. उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून हा दावा फेटाळून लावला. तसेच, याचिकाकर्त्यांना ते केवळ पोलिस असल्याच्या कारणामुळे कोणतेही संरक्षण मिळणार नाही, असेही सांगितले.


विनयभंगाचा गुन्हा दाखल
पेंढरी पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पोलिसांविरुद्ध विनयभंग व इतर संबंधित गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. २० मार्च २०१८ रोजी पीडित महिला व तिचा पती एका प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. दरम्यान, संबंधित पोलिसांनी त्यांना मारहाण व अश्लील शिवीगाळ केली, असा आरोप आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेHigh Courtउच्च न्यायालय