सदरमधील हॉटेलवर पोलिसांचा छापा

By Admin | Updated: June 1, 2015 02:40 IST2015-06-01T02:40:08+5:302015-06-01T02:40:08+5:30

गैरप्रकाराच्या तक्रारी मिळाल्यामुळे पोलिसांनी सदरमधील हॉटेल हेरिटेजवर शनिवारी मध्यरात्री छापा घातला.

Police raid at Sadar hotel | सदरमधील हॉटेलवर पोलिसांचा छापा

सदरमधील हॉटेलवर पोलिसांचा छापा

कारवाईचा गोलमाल : उलटसुलट चर्चेला उधाण
नागपूर : गैरप्रकाराच्या तक्रारी मिळाल्यामुळे पोलिसांनी सदरमधील हॉटेल हेरिटेजवर शनिवारी मध्यरात्री छापा घातला. तेथे पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केली. मात्र, पोलिसांना चौकशीत या हॉटेलमध्ये काय आढळले ते स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे सेंट्रल एव्हेन्यूवरील एका हॉटेलमध्ये शनिवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला.
गुन्हेशाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये गैरप्रकार सुरू असतात, अशा तक्रारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्या. त्यानुसार, पोलिसांचा मोठा ताफा शनिवारी मध्यरात्री हॉटेल हेरिटेजमध्ये शिरला. हाऊस आॅफ बीअर (एचओबी) सह हॉटेलच्या आतबाहेर मध्यरात्री दीडपर्यंत पोलिसांनी कसून तपासणी केली. पोलिसांचा एवढा मोठा ताफा पाहून आजूबाजूलाही गर्दी झाली. मात्र, नंतर काय कारवाई झाली ते रविवारी रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत वारंवार चौकशी करूनही पोलिसांकडून माहिती देण्याचे टाळले जात होते. दुसरीकडे शहरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होती. टेरेसवर गोंधळ आणि मारहाणीचा प्रकार घडल्याचीही चर्चा होती. पोलिसांनी मात्र याबाबत काही बोलण्याचे टाळले. कारवाईत सहभागी असलेले अधिकारी वरिष्ठांशी बोला, असे सांगत होते. तर, ‘संबंधित वरिष्ठांचे मोबाईल नो रिप्लाय‘ होते. सदर पोलिसांकडे विचारणा केली असता चलान कारवाईची नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. यापेक्षा अधिक काही सांगता येणार नसल्याचे सदर ठाण्यातील कर्मचारी म्हणाले. दुसरीकडे सेंट्रल एव्हेन्यूवरील एका हॉटेलच्या हुक्का पार्लरमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त होते. पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला. (प्रतिनिधी)

Web Title: Police raid at Sadar hotel