शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाही ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 03:09 IST

जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवणे, आपसांत समन्वय ठेवण्यासाठी व्हाटस्अ‍ॅप व ई-मेलचा वापर करणे, यासोबतच ...

अधिकाऱ्यांना मिळाला ‘टॅब’ : पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरणनागपूर : जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवणे, आपसांत समन्वय ठेवण्यासाठी व्हाटस्अ‍ॅप व ई-मेलचा वापर करणे, यासोबतच पेपरलेस काम करण्याच्या उद्देशाने पोलीस अधिकारी, ठाणेदार आणि शाखा प्रमुखांना टॅब आणि स्मार्ट फोन देण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात टॅबसह स्मार्ट फोनचे वितरण करण्यात आले.नागपूर ग्रामीणच्या टेकानाका येथील पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपअधीक्षक (गृह) रतनसिंग यादव, रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साळुंके, कामठीचे मंगेश शिंदे, काटोलचे ईश्वर कातकडे, सावनेरचे सुरेश भोयर यांच्यासह ठाणेदार, शाखा प्रमुख उपस्थित होते. पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार ‘प्रतिसाद अ‍ॅप’ नागपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे संचालन करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदारांना स्मार्ट फोन आणि टॅब देण्यात आले. या अ‍ॅपची तसेच स्मार्ट फोनमुळे आपसात संवाद ठेवून कामकाजात सुसूत्रता आणण्यात नक्कीच मदत होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक अनंत रोकडे म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील बिट अंमलदार यांनाही भविष्यामध्ये स्मार्ट फोन देण्याचा मानस आहे. यामुळे ठाणेदार आणि बिट अंमलदार यांना कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करता येईल. जिल्ह्यातील हिंगणा, जुनी कामठी, नवीन कामठी पोलीस ठाण्याचे काही दिवसांतच नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात हस्तांतरण करण्यात येणार आहे. तर खापरखेडा, देवलापार व कन्हान या पोलीस ठाण्यासाठी इमारत बांधली जाणार आहे, असे सांगितले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार, शाखा प्रमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)