शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेला पोलिसांनी दिला मदतीचा हात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

लक्ष्मीनगर येथील रहिवासी प्रभावती गणेश जठ्ठार शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती आणि मुलाचा खूप आधी मृत्यू झाला आहे. ...

लक्ष्मीनगर येथील रहिवासी प्रभावती गणेश जठ्ठार शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती आणि मुलाचा खूप आधी मृत्यू झाला आहे. त्यांचा मुलगा आयएएस अधिकारी होता, असे सांगण्यात येते. प्रभावती यांचे भाऊ सेवानिवृत्त आयएएस तथा वहिनी देशातील पहिली आयव्हीएफ सर्जन होत्या. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वामनराव तेलंग त्यांचे चुलतभाऊ होते. मुलाच्या मृत्यूनंतर प्रभावती यांची सुन आपला मुलगा आणि परिवारासोबत पुण्यात राहत होत्या. प्रभावती लक्ष्मीनगरात एकट्याच राहत होत्या. त्यांची देखभाल करणाऱ्या कामवालीने एका महिलेला त्यांच्या घरात आश्रय दिला होता. महिलेकडे संशयास्पद लोकांचे येणे-जाणे होते. प्रभावती यांच्या अवस्थेचा गैरफायदा घेऊन कामवालीने त्यांच्या बँक खात्यातून पैसे उडविणे सुरू केले होते. योग्य देखभाल न झाल्यामुळे काही दिवसापासून प्रभावती यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या घराची किंमत तीन कोटी रुपयापेक्षा अधिक आहे. कामवालीच्या मैत्रिणीने घरावर ताबा करण्याची शक्यता असल्यामुळे प्रभावती यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखविला. त्यांची अवस्था पाहून वामनराव तेलंग यांच्या पत्नी श्रद्धा तेलंग यांनी त्यांच्या सुनेला नागपुरात बोलावले. बजाजनगर पोलिसांनाही त्याची सूचना दिली. बजाजनगर ठाण्यातील हवालदार विकास मेंढे एकाकी जीवन व्यतित करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मदत करतात. मेंढे तात्काळ तेथे पोहोचले. त्यानंतर वसंतनगर परिसरातील वृद्धाश्रमात त्यांना भरती केले. वृद्धाश्रमाच्या जवळच श्रद्धा तेलंग कुटुंबासह राहतात. त्यामुळे प्रभावती स्वखुशीने वृद्धाश्रमात जाण्यासाठी तयार झाल्या. त्यांनी आपल्या मदतीसाठी हवालदार विकास मेंढे आणि बजाजनगर पोलिसांचे आभार मानले.

.............

कोरोनाच्या काळात केली मदत

प्रभावती यांना त्यांची सुन पुण्याला घेऊन जाऊ इच्छित होती. परंतु त्यांनी नकार दिला. बजाजनगर ठाण्याच्या परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. ते एकाकी जीवन व्यतित करतात. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये त्यांना रेशन आणि औषधी मिळत नव्हती. यावेळी मेंढे यांनी अनेक नागरिकांना मदत पोहोचविली.

.............